कोरोना काळात अनेक मोठ्या सिने नट-नट्यांनी लग्न केलं. या यादीत आता प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्री यामी गौतमचं नाव जोडलं गेलं आहे. यामी गौतम विवाहबंधनात अडकली आहे. यामीने आदित्य धरसोबत सप्तपदी घेतल्या आहेत. आदित्य धर हा उरी या सिनेमाचा डायरेक्टर आहे. कुटुंबिय आणि मोजक्याच नातेवाईकांच्या उपस्थितीत हा छोटेखानी विवाहसोहळा पार पडला. यामीने इंस्टाग्रामद्वारे लग्नाचा फोटो शेअर करत याबाबतची माहिती दिली आहे. यानंतर तिच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.
यामीने शेअर केलेल्या फोटोमध्ये सुंदर दिसत आहे. तिच्या चाहत्यांनी तिला लग्नानिमित्ताने अभिनंदन केलं आहे. यामीने इंस्टाग्राम पोस्टमध्ये पार्शियन कवी रुमी यांच्या कवितेतील ओळींचा उल्लेख केला आहे. “तुझ्या प्रकाशात मी प्रेम करायला शिकले”, असं यामीने या पोस्टमध्ये म्हटलंय. यामी या फोटोमध्ये सुदंर दिसत आहे. यामी आणि आदित्य एकमेकांना उरी सिनेमापासून ओळखतात.
यामीने ‘उरी’ या सिनेमातून आपल्या अभिनयाद्वारे प्रेक्षकांच्या मनावर छाप सोडली. यामीने हिंदीसह तामिळ आणि तेलुगु सिनेमांमध्येही अनेक भूमिका यशस्वीपणे पार पाडल्या आहेत. यामीने एका ब्युटी प्रोडक्टच्या जाहिरातीतून लोकांसमोर आली होती. यानंतर तिने गरुडभरारी घेतली.
तिने 2012 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘विकी डोनर’ या सिनेमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं होतं. तेव्हापासून तिने अनेक सिनेमांमध्ये काम केलं. तिच्या उत्तम अभिनयासाठी तिला अनेक पुरस्काराने गौरवण्यात आले आहे.