राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि माजी मंत्री एकनाथ खडसे यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. कारण ईडी कोर्टाने जे निरीक्षण नोंदवलं आहे, त्यामुळे एकनाथ खडसे यांचा पाय आणखी खोलात गेला आहे. प्राथमिकदृष्ट्या पाहिलं तर एकनाथ खडसेंनी पुणे जमीन खरेदीत गैरव्यवहार केल्याचं स्पष्ट दिसतंय, असं स्पष्ट निरीक्षण ईडी कोर्टाने नोंदवलं आहे.
एकनाथ खडसेंनी मंत्री असताना पदाचा गैरवापर करत स्वतःच्या कुटुंबातील सदस्यांना फायदा करवून दिला, असंही कोर्टाने म्हटलं आहे. त्यामुळे एकनाथ खडसेंचे जावई गिरीश चौधरी यांना अशा परिस्थिती आरोपीला जामीन देता येणार नाही अन्यथा समाजात वाईट संदेश जाईल, असं कोर्टाने ठणकावून सांगितलं.
कोर्टाने असंही म्हटलंय की या गोष्टीकडेही दुर्लक्ष करून चालणार नाही की खडसे हे महाराष्ट्रातल्या सत्ताधारी पार्टीचा भाग आहेत, मात्र हा गुन्हा घडताना ते भाजपमध्ये होते.