गडचिरोलीत किमान 100 नक्षलवाद्यांशी आमची चकमक उडाली होती. त्यात छत्तीसगडचेही काही नक्षलवादी होते. आम्ही जोरदार हल्ला केल्याने 26 नक्षलवादी मारले गेले. तर बाकीचे नक्षलवादी पळून गेले असं गडचिरोलीच्या पोलिसांनी सांगितलं.
गडचिरोलीत काल पोलसी आणि नक्षलवाद्यांची मोठी चकमक उडाली. त्यात 26 नक्षलवादी मारले गेले. या ऑपरेशनची माहिती देण्यासाठी गडचिरोलीचे एसपी अंकित गोयल यानी पत्रकार परिषद घेतली. डीआयजीच्या मार्गदर्शनाखाली हे ऑपरेशन पार पडलं. अॅडिशनल एसपी समीर, अॅडिशनल एसपी अनूज तारी यांचं मार्गदर्शन लाभलं. तसेच सोमय मुंडे हे ग्राऊंडवर लीड करत होते. प्रचंड गोळीबार होऊन सुद्धा पोलीस आणि जवान लढले. आमच्याकडून मिळालेलं प्रत्युत्तर पाहून बाकीचे नक्षल पळून गेले आहेत. त्यांचा शोध घेत आहोत, असं अंकित गोयल यांनी सांगितलं. सकाळी 6 वाजता ही चकमक सुरू झाली. तब्बल 9 तासही चकमक सुरू होती, असं त्यांनी स्पष्ट केलं.
गडचिरोलीत नक्षलवाद्यांचं कॅम्प सुरू होतं. त्यासाठी 300 नक्षलवादी जमले होते. कशासाठी हे कॅम्प होतं माहीत नाही. त्या कॅम्पच्या ठिकाणी काही साहित्य मिळालं आहे. त्याचा अनुवाद केल्यानंतर अधिक माहिती मिळेल, असं सांगतानाच या 300 नक्षलवाद्यांविरोधात आमचे 100 पोलीस आणि सी-60 तसेच स्पेशल अॅक्शन ग्रुपचे जवान लढले, असं त्यांनी सांगितलं. नक्षलवाद्यांची फायर पॉवर पाहता आणि ते ज्या आक्रमकपणे लढत होते ते पाहता किमान शंभर नक्षलवादी जंगलात होते हे दिसून येतं, असंही गोयल यांनी सांगितलं.
या हल्ल्यात मिलिंद तेलतुंबडे हा नक्षलवादी कमांडर ठार झाला आहे. तेलतुंबडे हा एमएमसी झोनचा कमांडर होता. दंडकारण्य जसं त्यांचं राज्य आहे. तसंच एमएमसी झोन त्यांचं राज्य आहे. त्या राज्याचा तो प्रमुख होता. त्यामुळे कालचं यश हे फार मोठं असून त्याचा महाराष्ट्रालाच नाही तर मध्यप्रदेश आणि छत्तीसगडलाही मोठा फायदा झाला आहे, असंही त्यांनी सांगितलं.
काही दिवसांपूर्वी एका नक्षलवाद्याने शरणागती पत्करली होती. तेव्हा त्याने 300 नक्षलवादी माड एरियातून एमएमसी झोनमधून न्यायचे होते असं त्याने सांगितलं होतं. ही लीड मिळाल्यानंतर ही कारवाई करण्यात आली, असं सांगतानाच काल झालेल्या चकमकीतील सर्व नक्षलवादी वर्दीवरच होते, असंही त्यांनी सांगितलं.
चमकीत छत्तीसगडचे नक्षलवादीही ठार झाले आहेत. ते छत्तीसगडचे असले तरी महाराष्ट्रासाठी काम करत होते. गडचिरोलीत ऑपरेट करणारेच होते. गडचिरोलीत बाहेरून येणाऱ्या नक्षलवाद्यांची संख्या वाढत आहे. स्थानिक मुलांकडून त्यांना रिस्पॉन्स मिळत नाही. त्यामुळे ते बाहेरच्या मुलांची नक्षलवादी कारवायांसाठी भरती केली जात आहे, असंही त्यांनी सांगितलं.