आज दि.८ आॕगस्ट च्या दिवसभरातील ठळक घडामोडी अशा….

आज रात्री ८ वाजता जनतेशी

मुख्यमंत्री साधणार संवाद

देशातील बऱ्याच राज्यांमध्ये कोरोनाचे निर्बंध शिथिल करण्यात आले आहेत. मात्र महाराष्ट्रात अजूनही काही अपवाद वगळता काही निर्बंध हे कायम आहेतच. यामध्ये मुंबई उपनगरीय लोकल रेल्वे प्रवास , मंदिरं हे बंदच आहेत. रेल्वे लोकल विना सर्वसामन्यांचे हाल होतायेत. त्यामुळे लोकल सुरु करण्यासोबतच सर्व निर्बंधांमधून मुक्त करावं, अशी मागणी केली जात आहे. या पार्श्वभूमीवर राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज रात्री जनतेशी व्हीडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे संवाद साधणार आहेत.रात्री 8 वाजता राज्यातील जनतेला संबोधित करणार आहेत. त्यामुळे उद्धव ठाकरे निर्बंधातून पूर्णपणे सूट देणार की फक्त काही अंशी दिलासा देणार याकडे सर्वांचेच लक्ष असणार आहे.

या निर्णयांकडे असणार लक्ष

  • राज्यातील लसीकरण
  • लोकलमध्ये दोन डोस दिलेल्यांना प्रवास करण्याची मुभा द्यावी अशी होणारी मागणी
  • राज्यातील हॉटेल आणि रेस्टॉरंटची वेळ वाढवून देण्याबाबत होणारी मागणी
    -पुण्यासारख्या शहरात लॉकडाऊनमध्ये शिथिलता मिळालेली नाही, तिथे व्यापारी आंदोलन करतायत
  • गणेशोत्सव आणि धार्मिक सण येतातच त्यासाठी राज्य सरकारची भूमिका
  • गणेशोत्सवावर निर्बंध लावू नयेत अशी भाजप मागणी करतंय, हिंदूंच्या सणांना निर्बंध नको अशी भाजपकडून मागणी होतंय त्यावर मुख्यमंत्री भाष्य करण्याची शक्यता

अमेरिका, रशिया, ब्राझीलसह
अनेक देशांमध्ये कोरोनाचा कहर

संपूर्ण जगाला हादरवून सोडणाऱ्या कोरोनाची भीती कमी होईल, असे वाटत असतानाच आता पुन्हा एकदा हे संकट अधिकच गडद होत चालले आहे. विशेषत: अमेरिका, रशिया, ब्राझीलसह जगातील अनेक देशांमध्ये कोरोनाचा कहर सुरूच आहे. जॉन्स हॉपकिन्स विद्यापीठाच्या अहवालात म्हटले आहे की, जगातील लसीकरण उद्दीष्ट ४.३४ अब्ज पार झाले आहे. तरीही नवे बाधित आणि मृत्यूच्या संख्येच्या बाबतीत अमेरिका अजूनही साथीच्या रोगाने सर्वाधिक प्रभावित देश आहे. जगातील कोरोना बाधितांची संख्या २०१ दशलक्षांपुढे गेली आहे. मृतांची संख्या ४२ लाख झाली आहे.

चीनच्या वुहानमध्ये कोरोनाचा
पुन्हा फैलाव सुरु

करोनाचा उगम झालेल्या चीनच्या वुहानमध्ये पुन्हा फैलाव सुरु झाला आहे. वुहानमध्ये गेल्या काही दिवासात करोना रुग्ण वाढू लागले आहेत. करोनाचं संकट पाहता प्रशासनाने चाचण्यावर भर दिला आहे. वुहानमधील १.२ कोटी लोकसंख्येपैकी १.१ कोटी नागरिकांची चाचणी झाली असल्याचं स्थानिक अधिकाऱ्यांनी सांगितलं आहे. चार दिवसात वुहानमध्ये ९० टक्के लोकांची करोना चाचणी झाली आहे.

कोवॅक्सिन आणि कोविशिल्ड लस
एकत्र मिळण्याची शक्यता वाढली

कोरोना विषाणू विरोधातील लढ्यात आणखी एक चांगली बातमी मिळाली आहे. कोवॅक्सिन आणि कोविशिल्ड लशीच्या मिश्रीत डोसचे निष्कर्ष समाधानकारक आले आहेत, असे भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेने म्हटले आहे. दोन्ही लशीचे डोस एकत्र केल्यानंतर कोरोनाविरोधात सुरक्षित लस निर्माण झाली असून, लशीमुळे रोग प्रतिकारक शक्तीसुद्धा वाढल्याचे संशोधनात निदर्शनास आले आहे. संशोधनातील अहवालाचे निष्कर्ष अधिक परिणामकारक मिळाल्यास कोवॅक्सिन आणि कोविशिल्ड मिश्रीत डोसला केंद्राकडून मंजुरी मिळण्याची शक्यता आहे.

पुण्यातील सर्व दुकाने
रात्री आठपर्यंत सुरू राहणार

पुण्यातील सर्व दुकानं सोमवार ते शुक्रवार सकाळी ७ ते रात्री ८ पर्यंत सुरु राहणार तर हॉटेल्स रात्री १० पर्यंत सुरु ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. पुण्यात शनिवारी आणि रविवारी सर्व सेवांना दुपारी चारपर्यंत सुरु ठेवण्यास परवानगी देण्यात आली आहे. मॉल्सदेखील सोमवार ते शुक्रवार रात्री आठ वाजेपर्यंत सुुर ठेवण्यास परवानगी देण्यात आली असून लसीचे दोन्ही डोस घेतलेल्यांना प्रवेश दिला जाणार आहे.

नीरज म्हणतो यशासाठी
मोबाईल पासून दूर राहिलो

कोणत्याही क्षेत्रात सर्वोत्कृष्ट पदावर पोहोचण्यासाठी इच्छा हवीच. हेच ऑलिम्पिकमध्ये सुवर्ण पदक विजेत्या भालाफेकपटू नीरज चोप्राने दाखवून दिले आहे. नीरजचे वय अवघे २३ वर्षांचे आहे. पण या वयातही त्याने केलेली मेहनत निश्चितच इतरांना प्रेरणादायी आहे. आपल्या यशाबद्दल सांगताना नीरज म्हणाला गेल्या वर्षभरापासून मोबाईलला हात देखील लावलेला नाही.

संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेच्या
बैठकीला पाकिस्तानला बोलवलेच नाही

संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेचे अध्यक्षपद मिळताच भारत अॕक्नश मोडमध्ये आला असून, त्याचे परिणामही पाहायला मिळत आहे. भारताच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत अफगाणिस्तानच्या परिस्थितीवर चर्चा झाली. त्या बैठकीत पाकिस्तानला निमंत्रण पाठविण्यात आले नाही. यामुळे पाकिस्तान अस्वस्थ झाला आहे. अफगाणिस्तानच्या शेजारील देश असूनही निमंत्रित न केल्याबद्दल पाकिस्तानने नाराजी व्यक्त केली आहे.

वायुसेनेच्या हवाई हल्ल्यात 200 पेक्षा
जास्त तालिबान दहशतवादी ठार

वायू सेनेने केलेल्या हवाई हल्ल्यात २०० पेक्षा जास्त तालिबान दहशतवादी ठार झाल्याची माहिती समोर आली आहे. अफगाणिस्तानच्या सुरक्षा मंत्रालयाच्या अधिकाऱ्याच्या म्हणण्यानुसार, तालिबानला मोठ्या नुकसानाला सामोरं जावं लागलं, जेव्हा वायू सेनेने शेबर्गन शहरात त्यांच्या ठिकाणांना लक्ष्य केले. हल्ल्यात २०० तालिबान सदस्यांचा खात्मा झाला.

विधानसभेत गोंधळ घालणार्‍या आमदारांवर
गुन्हा दाखल होणार नाही का?

एखाद्या आमदाराने विधानसभेत पिस्तुल काढून ते रिकामे केले तर त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला जाणार नाही का? ही घटना सभागृहात झाली म्हणून सर्वोच्चतेचा दावा करून संबंधितांविरुद्ध गुन्हा दाखल केला जाणार नाही का? असा प्रश्न सर्वोच्च न्यायालयाने उपस्थित केला आहे.

मंदिरात आलेल्या महिलेला
पुजाऱ्यांकडून केस धरून मारहाण

मंदिरात पूजा करण्यासाठी आलेल्या एका महिलेला तिचे केस धरून पुजाऱ्याने मारहाण केल्याची घटना दरभंगा जिल्ह्यात घडली आहे. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होताच मंदिर समितीने पुजाऱ्यावर कारवाई केली असून चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. तसेच सध्या पुजाऱ्याला मंदिराच्या पूजा कार्यातून काढून टाकण्यात आले आहे.

भंडारा जिल्हा ठरला
राज्यातील पहिला कोरोनामुक्त

काही जिल्ह्यांमध्ये नियमांमध्ये शिथिलता करण्यात आली असली तरीही कोरोनाचे संकट कायम आहे. त्यातच दिलासादायक बातमी म्हणजे भंडारा जिल्हा राज्यातील पहिला पूर्ण कोरोनामुक्त जिल्हा महाराष्ट्रात ठरला आहे.

नागपूर जिल्ह्याची वाटचाल
कोरोनामुक्तीच्या दिशेनं

कोरोनाची लाट उसळल्यानंतर नागपूर शहरात पहिल्यांदा काल कोरोनाचा एकही पॉझिटिव्ह रुग्ण आढळला नाही. त्यामुळे जिल्ह्याची वाटचाल कोरोनामुक्तीच्या दिशेनं सुरु आहे. परंतु नागरिकांनी यामुळे हुरळून न जाता अधिक काळजी घेण्याची आवश्यकता असल्याचे आवाहन नागपूर जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. नितीन राऊत यांनी केले आहे.

मिझोरम मध्ये पेट्रोल टंचाई, कारसाठी
10 लीटर पेट्रोल मिळणार

इंधन दरवाढीमुळे देशातील नागरिक मेटाकुटीला आले असतानाच मिझोराममध्ये एक नवा पेच उद्भवला आहे. गेल्या काही दिवसांपासून आसाम आणि मिझोराम (Mizoram) या दोन राज्यांमध्ये संघर्ष निर्माण झाला आहे. त्यामुळे आसाम आणि मिझोराममधील राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक ठप्प झाली आहे. त्यामुळे मिझोराममध्ये इंधनाची प्रचंड टंचाई निर्माण झाली आहे. मिझोराम सरकारने वाहनासाठी इंधनाची मर्यादा ठरवून देण्यात आली आहे. दुचाकीस्वारांना 5 लीटर आणि चारचाकी वाहनांना फक्त 10 लीटर इंधन मिळत आहे.

SD social media
9850 60 3590

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

scroll to top
error: आपल्याला माहिती कॉपी करण्याची परवानगी नाही.