बिपीन रावत यांचा आधीही झाला होता हेलिकॉप्टर अपघात

तामिळनाडू हेलिकॉप्टर अपघातातील मृतांचा आकडा तब्बल 13वर पोहोचला आहे. त्यामुळे देशात सध्या शोकाकूल वातावरण निर्माण झालं आहे. लष्कराच्या इतिहासातली ही सर्वात मोठी हेलिकॉप्टर दुर्घटना असेल, कारण सीडीएस बिपीन रावत याच हेलिकॉप्टरने प्रवास करत होते, त्यांच्याबरोबर त्यांच्या पत्नीही होत्या. त्याचबरोबर लष्करातील इतर काही उच्चपदस्थ अधिकारीही होते. या हेलिकॉप्टर अपघातानंतर दिल्लीतल्या हलचाली, बैठकाही वाढल्या आहेत.

सीडीएस बिपीन रावत यांचा हेलिकॉप्टर अपघात होण्याची ही पहिलीच वेळ नाही. याआधीही बिपीन रावत यांचा हेलिकॉप्टर अपघात झाला आहे. त्यातून ते किरकोळ जखमी होत सुरूखरूप वाचले आहेत. ही घटना आहे 3 फेब्रुवारी 2015ची ज्यावेळी याआधी बिपीन रावत यांचा हेलिकॉप्टर अपघात झाला होता. त्यावेळी बिपीन रावत सीडीएस पदावरती नव्हते, रावत यांना सीडीएस पदावर 2016 मध्ये नियुक्त करण्यात आलं आहे. तेव्हा लेफ्टनंट बिपीन रावत नागालँडमधील दिमापूरमध्ये तैनात होते. दिमापूरमध्ये हेलिकॉप्टरमध्ये बसून रावत निघाले, आणि काही वेळातच हेलिकॉप्टरचं नियंत्रण सुटले आणि हेलिकॉप्टर पुन्हा जमीनीवर कोसळलं. हे हेलिकॉप्टर काही अंतरावर गेल्यानंतरच त्याचं इंजिन फेल झाले आणि ते कोसळले. हेलिकॉप्टर जास्त उंचीवर गेले नसल्याने रावत आणि पायलट यांना किरकोळ जखमा झाल्या होत्या. त्यानंतर या घटनेची उच्चस्तरीय चौकशी करण्यात आली होती.

हेलिकॉप्टरचे अपघात अत्यंत भयंकर होत असतात. त्यातून बऱ्याचवेळा वाचण्याची शक्यता फार कमी असते, मात्र 2015 मध्ये झालेल्या हेलिकॉप्टर अपघातातून रावत मरणाला मात देऊन सुखरूप वाचले होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

scroll to top
error: आपल्याला माहिती कॉपी करण्याची परवानगी नाही.