आज दि.८ डिसेंबर च्या दिवसभरातील ठळक घडामोडी अशा…

संरक्षण दलाचे प्रमुख बिपीन रावत यांचे
हेलिकॉप्टर दुर्घटनाग्रस्त आतापर्यंत १३ जणांचा मृत्यू

संरक्षण दलाचे प्रमुख जनरल बिपीन रावत प्रवास करत असलेलं एमआय-१७ व्ही५ हे हेलिकॉप्टर दुर्घटनाग्रस्त झालं आहे. या हेलिकॉप्टरमधून बिपीन रावत यांच्यासोबत त्यांच्या पत्नी तसंच इतर १४ वरिष्ठ अधिकारी प्रवास करत होते. या दुर्घटनेत आतापर्यंत १३ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. दरम्यान बिपीन रावत यांना रुग्णालयात दाखल करण्यात आल्याची माहिती माजी संरक्षण राज्यमंत्री सुभाष भामरे यांनी दिली आहे. या अपघातानंतर केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी रावत यांच्या दिल्लीतील निवासस्थानी जाऊन त्यांच्या नातेवाईकांची भेट घेतली. या अपघाताबद्दलची सविस्तर माहिती राजनाथ सिंह यांनी कुटुंबियांना दिल्याचं सांगितलं जात आहे.

अपघात कसा झाला याचा तपास
करण्यासंदर्भातील आदेश

भारतीय हवाई दलाने पहिली प्रतिक्रिया देताना जनरल बिपीन रावत हेलिकॉप्टरमध्ये होते या वृत्ताला दुजोरा दिलाय. भारतीय हवाई दलाचे एमआय १७ व्ही ५ या हेलिकॉप्टरमधून संरक्षण दलाचे प्रमुख जनरल बिपीन रावतही प्रवास करत होते. तामिळनाडूमधील कुन्नूरजवळ अपघात झाला आहे. हा अपघात कसा झाला याचा तपास करण्यासंदर्भातील आदेश देण्यात आले आहेत,” असं हवाई दलाने म्हटलं आहे.

संरक्षण मंत्री राजनाथ सिंह
घटनास्थळाला भेट देणार

राजनाथ सिंह हे आपले सर्व नियोजित कार्यक्रम रद्द करुन तातडीने अपघात झालेल्या ठिकाणाला भेट देणार आहेत. रावत यांच्या हेलिकॉप्टरला अपघात झाल्याची माहिती मिळाल्यानंतर राजनाथ सिंह यांनी हा मोठा निर्णय घेतल्याची माहिती समोर येत आहे. संरक्षण मंत्र्याच्या भेटीसंदर्भातील तयारी केली जात असल्याची माहिती समोर आली आहे. हेलिकॉप्टरमध्ये सात जण होते अशी माहिती भारतीय हवाई दलाने दिलीय.

व्लादिमीर पोटॅनिन जगातील सर्वात मोठ्या घटस्फोटाच्या दाव्याला सामोरे जाणार

जेफ बेझोस आणि बिल गेट्स यांच्यानंतर रशियाचे दुसरे सर्वात श्रीमंत व्यक्ती व्लादिमीर पोटॅनिन हे जगातील सर्वात मोठ्या घटस्फोटाच्या दाव्याला सामोरे जात आहेत. पोटॅनिन यांची पूर्व पत्नी, नतालिया पोटॅनिया, MMC Norilsk Nickel PJSC मधील त्याच्या स्टेकच्या एकूण मूल्याच्या ५०% रक्कम मागत आहे,. मंगळवारी लंडन न्यायालयात या प्रकरणाची सुनावणी झाली. घटस्फोटाच्या दाव्याची ही रक्कम ७ अब्ज डॉलर्सपेक्षा जास्त असू शकते, असं म्हटलं जातंय.
पोटॅनिनाने पोटॅनिन यांच्यावर ‘डिवॉर्स टुरीझम’ केल्याचा आरोप केल्यानंतर पोटॅनिन खटला लढवत आहे.

कोविशील्ड लसीचे उत्पादन ५०
टक्क्यांनी कमी करण्याचा निर्णय

सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाने कोविशील्ड लसीचे उत्पादन ५० टक्क्यांनी कमी करण्याचा निर्णय घेतला आहे, अशी माहिती सीरमचे सीईओ अदार पूनावाला यांनी मंगळवारी दिली. केंद्राकडून लसीची मागणी नसल्यामुळे कोविशील्डचे उत्पादन कमी करण्याचा निर्णय घेतल्याचं यावेळी त्यांनी सांगितलं. पुढच्या आठवड्यापासूनच लसीचं उत्पादन कमी केलं जाणार असल्याचंही बोलताना ते म्हणाले.

मालेगाव शहराच्या मध्यवस्तीत
तब्बल 12 लाखांची घरफोडी

मालेगाव शहराच्या अगदी मध्यवस्तीत झालेल्या तब्बल 12 लाखांच्या घरफोडीने मालेगाव हादरले आहे. बारा बंगला भागातल्या नवजीवन हॉस्पिटलचे संचालक डॉ. दिलीप भामरे यांच्या घरी चोरट्यांनी ही हातसफाई केली. याप्रकरणी छावणी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. पोलिसांनी या घरफोडीचा तपास सुरू केला आहे.

सोलापूरचे भाजपाचे उपमहापौर
राजेश दिलीप काळे तडीपार

विविध गंभीर गुन्हे नावावर असलेले सोलापूरचे भाजपाचे उपमहापौर राजेश दिलीप काळे यांना सोलापूर शहर व जिल्ह्यासह शेजारच्या उस्मानाबाद आणि पुणे जिल्ह्यातील इंदापूर तालुक्यातून पुढील दोन वर्षांसाठी तडीपार करण्यात आले आहे. ही कारवाई सोलापूर शहर पोलिसांनी केली आहे. सोलापूरचे विद्यमान उपमहापौर राजेश काळे हे सातत्याने वादग्रस्त ठरले आहेत.

SD social media
9850 60 3590

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

scroll to top
error: आपल्याला माहिती कॉपी करण्याची परवानगी नाही.