या कुटुंबाचा दरमहा पगार आहे, फक्त शंभर कोटी रुपये

एखाद्या कुटुंबात एका महिन्यात किती रुपये कमाई येऊ शकते याचा सर्वसामान्य माणसाने अंदाज केला तर फारतर ते लाखाच्या घरात आकडे सांगू शकतील. मात्र, देशात असेही लोक आहेत जे महिन्याला कोट्यावधी रुपये कमावतात. असंच एक कुटुंब सध्या महिन्याला तब्बल 100 कोटी रुपयांची कमाई करत आहेत. इतकंच नाही तर ते इतरांनाही कमाईचा मार्ग सांगतं. हे ऐकून नेमका या कुटुंबा व्यवसाय काय आणि ते इतरांना कमाईचा कोणता मार्ग सांगतं याबद्दल तुम्हाला प्रश्न पडला ना? चला तर जाणून घेऊयात कोट्यावधी कमाईचा या कुटुंबाचा मार्ग.

या कुटुंबाचा कोट्यावधी रुपये कमाईचा मार्ग आहे शेयर बाजार. हे कुटंब जिरोधा या आपल्या कंपनीच्या माध्यमातून हजारो लोकांना कमाईचा मार्ग सांगतात. सोबतच स्वतःही कोट्यावधी कमावतं. जीरोधाचे संस्थापक नितिन कामथ, त्यांची पत्नी सीमा पाटील आणि नितिनचे बंधू निखिल कामत यांचा महिन्याकाठी पगार 100 कोटी रुपये आहे. बंगळुरुमधील त्यांची ऑनलाईन प्लॅटफार्म असलेली कंपनी लोकांनाही कमाईसाठी मदत करते. या प्लॅटफॉर्मवर लोक इक्विटी मार्केटवर डिलिव्हरी आणि इंट्रा डे दोन्हीचे व्यवहार करु शकतात. 2010 मध्ये स्थापन झालेली ही कंपनी सध्या गुंतवणुकदारांमध्ये चांगलीच लोकप्रिय आहे.

भारतीय बाजारात एंजल ब्रोकिंग, जिरोधा, शेयरखान असे अनेक ट्रेडिंग प्लॅटफॉर्म लोकप्रिय आहेत. हे प्लॅटफॉर्म लोकांना शेअर बाजाराच्या माध्यमातून मोठी कमाई करुन देतात. मात्र, या कंपन्यांचे मालकही कोट्यावधी कमावतात. कमाईत हे लोक मोठ मोठ्या कंपन्यांच्या अधिकारी आणि मालकांनाही मागे टाकतात.

केवळ 10 वर्षात जीरोधा कंपनीने वेगाने उंची गाठलीय. याचा अंदाज कंपनीच्या बाजारमुल्यावरुन येऊ शकेल. केवळ 10 वर्षात कंपनीचं बाजारमुल्य 2 अब्ज डॉलर झालंय. आता कंपनी या प्रगतीचा फायदा कर्मचाऱ्यांना देणार आहे. यानुसार कंपनीने आपल्या सुरुवातीच्या कर्मचाऱ्यांना शेयर बायबॅक करण्याची योजना आणलीय. जीरोधाचं मुल्य केवळ 1 वर्षात दुप्पट झालंय. कंपनी जवळपास 2.5 कोटी डॉलरच्या (150-200 कोटी रुपये) एम्प्लॉयी स्टॉक ऑप्शन प्लॅन बायबॅक योजनेवर काम करत आहे.

याआधी आर्थिक वर्ष 2020 मध्ये सम फार्माचे कलानिथी मारन यांचा पगार 87.5 कोटी रुपये सांगण्यात आला होता. दुसरीकडे हिरो मोटकॉर्पचे पवन मुंजाल यांचा पगार 84.6 कोटी रुपये होता. आमरा राजाचे संस्थापक जयादेव गाला यांचा पगार जवळपास 45 कोटी रुपये असल्याचं सांगण्यात आलंय. असं असलं तरी टेक महिंद्राचे सीईओ सी पी गुरनानी यात अव्वल आहेत. त्यांचा पगार जवळपास 146 कोटी रुपये आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

scroll to top
error: आपल्याला माहिती कॉपी करण्याची परवानगी नाही.