आज दि.१ जुलै च्या दिवसभरातील ठळक घडामोडी अशा…

‘आमचा शेतकरी आत्महत्यामुक्त महाराष्ट्र करण्याचा संकल्प’, एकनाथ शिंदेंचं मोठं विधान

शिवेसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर आज ‘न्यूज18 लोकमत’ला विशेष मुलाखत दिली. या मुलाखतीत त्यांनी आगामी पुढच्या अडीच वर्षात नवं सरकार काय-काय कामे करेल याबाबत माहिती दिली. विशेष म्हणजे या सरकारला शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची तरतूद करायची आहे. त्यांच्यासाठी विविध योजना आणायच्या आहेत जेणेकरुन शेतकऱ्यांची आत्महत्या नाहीशी होईल, महाराष्ट्र आत्महत्यामुक्त होईल, असा संकल्प असल्याचं एकनाथ शिंदे मुलाखतीत म्हणाले.शेतकऱ्यांशी संबंधित जलसंपदा विभागातील अनेक प्रकल्प रखडलले आहेत ते प्रकल्प मार्गी लागले तर मोठ्या प्रमाणातील पाण्याचं सिंचन होईल. बळीराजा हा आपला मायबाप आहे. त्याला सुखी करण्यासाठी सरकार कटिबद्ध आहे. शेतकऱ्यांसाठी आम्ही महत्त्वाची पाऊलं उचलणार आहोत. त्याचबरोबर शेतकरी आत्महत्यामुक्त महाराष्ट्र करण्याचा संकल्प आमचा आहे. खूप मोठ्या प्रमाणावर विकास प्रकल्प मार्गी लावण्यासाठी आमचं सरकार कटिबद्ध आहे”, असं एकनाथ शिंदे म्हणाले.

“मोदीजी NEET पुढे ढकला अन्यथा आयुष्यात भाजपला मत देणार नाही” सोशल मीडियावर पोस्ट्स व्हायरल

नॅशनल एलिजिबिलिटी आणि एंट्रन्स परीक्षा 2022 शी संबंधित हॅशटॅग सोशल मीडियावर ट्रेंड करत आहेत. नॅशनल टेस्टिंग एजन्सी, NTA ने JEE Mains 2022 पुढे ढकलल्यापासून NEET परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांनी मागणी केली आहे. ट्विटरवरकाही हॅशटॅग्स ट्रेंड करत आहे. NEET परीक्षेसाठी विद्यार्थ्यांना फार कमी वेळ मिळणार आहे म्हणून NEET 2022 परिक्षा पुढे ढकलण्यात यावी अशी मागणी सुरु आहे. इतकंच नाही तर ही परीक्षा पुढे ढकलावी, नाहीतर आयष्यात भाजपला एकही मत देणार नाही अशी पोस्ट काही नेट यूजर्स करत आहेत.

फडणवीस आणि ठाकरेंमध्ये प्रतिष्ठेचा मुद्दा ठरलेला ‘आरे कारशेड’ प्रकल्प

राज्याचे मुख्यमंत्री झाल्यानंतर एकनाथ शिंदे यांनी कुलाबा-वांद्रे-सिप्झ या मेट्रो 3 चे कारशेड आरे कॉलनीमध्येच होणार असल्याचं जाहीर केलं आहे. यापूर्वीच्य उद्धव ठाकरे सरकारनं आरे कॉलनींमध्ये होणारा हा प्रकल्प रद्द केला होता. त्यानंतर शिंदे सरकारनं पहिल्याच बैठकीत ठाकरे सरकारचा निर्णय फिरवत पुन्हा एकदा मेट्रो 3 चे कारशेड हे आरे कॉलनीमध्येच होणार असल्याचं जाहीर केलं आहे. राज्य सरकारनं अ‍ॅडव्होकेट जनरलला या प्रकरणात कोर्टात बाजू मांडण्याचे आदेश दिले असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

इंटरनेटच्या गैरप्रकारांना रोखण्यासाठी बंबलची ‘स्टँँड फॉर सेफ्टी’ मोहीम

इंटरनेटच्या वाढत्या वापरासोबत यातील गैरप्रकार , जसे की एखाद्या व्यक्तीच्या शरीराचे विद्रुपीकरण करणे, त्यासंबंधी ट्रोलिंग आणि अशा इतर सर्व प्रकारच्या ऑनलाईन अत्याचारांमध्ये विशेषकरून महामारीनंतर दिवसेंदिवस वाढ होत चालली आहे. या सुरक्षेसंबंधी प्रश्नांवर तोडगा काढण्यासाठी , बंबलने ‘स्टँँड फॉर सेफ्टी’ मोहिमेची सुरुवात केली आहे, ज्यामुळे त्यांच्या समुदायामध्ये डीजीटल सुरक्षेविषयी जागरूकता निर्माण होईल आणि ऑनलाईनच्या माध्यमातून होणाऱ्या द्वेषपूर्ण कृतींपासून आणि अत्याचारापासून स्वत:ला वाचवण्यासाठी याची मदत होईल.

पुणे – आता एकदिवसाआड होणार पाणीपुरवठा, 4 जुलैपासून अंमलबजावणी सुरू

मुंबई महानगरपालिकेकडून पाणी कपातीचा निर्णय घेण्यात आला होता. त्यानंतर लगेचच ठाणे महानगरपालिकेसुद्धा याच संदर्भातील निर्णय घेण्यात आला. मात्र, यापाठोपाठ आता पुणेकरांसाठीही वाईट बातमी आहे. पुणेकरांनाही आता पाणीकपातीचा सामना करावा लागणार आहे.पुण्यातल्या धरण साखळीत पाण्याची पातळी घसरली आहे. त्यामुळे, शहराला दिवसाआड पाणीपुरवठा होण्याची शक्यता होती. त्याबाबतचा निर्णय घेण्यात आला आहे. म्हणून आता पुण्यात सोमवार, 4 जुलैपासून एकदिवसाआड पाणीपुरवठा होणार आहे.

मुख्यमंत्रीपद मिळालं, परंतू आता खरी अग्निपरीक्षा; शिंदे गटात मंत्रिपदासाठी रस्सीखेच सुरू

शिवसेना पक्षातून बाहेर पडलेले एकनाथ शिंदे  यांनी गुरुवारी 30 जून रोजी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. याशिवाय देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. त्यामुळे आता संपलं असं नाही. तर अर्धी लढाई अद्यापही बाकी आहे. शिवसेना फोडून बाहेर पडलेल्या 40 हून अधिक आमदारांची मंत्रीपदासाठी रस्सीखेच सुरू असल्याचं पाहायला मिळत आहे.

टीव्हीवर जाऊन देशाची माफी मागा; नुपूर शर्मा यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारलं

प्रक्षोभक वक्तव्य केल्याबद्दल नुपूर शर्मा यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले आहे. तुमच्या वक्तव्याने देशातील वातावरण बिघडले आहे, असे सुप्रीम कोर्टाने नुपूर शर्मा यांना सुनावले. तुम्ही टीव्हीवर जाऊन माफी मागावी, असे आदेशही सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत.सर्वोच्च न्यायालयाने म्हटले की, तुम्ही बेजबाबदार विधान केले आहे. सर्वोच्च न्यायालयाने म्हटले की, तुम्ही स्वत:ला वकील म्हणता, तरीही असे वक्तव्य केले. तुमच्या वक्तव्यामुळे देशातील वातावरण बिघडले आहे. तुमच्या वक्तव्यामुळे देशाची बदनामी झाली आहे. 

संसदेच्या पावसाळी अधिवेशनाला १८ जुलैपासून सुरुवात

संसदेच्या पावसाळी अधिवेशनची तारीख जाहीर झाली आहे. १८ जुलैला संसदेच्या दोन्ही सभागृहाच्या पावसाळी अधिवेशनाला सुरुवात होणार असून १३ ऑगस्टपर्यंत हे अधिवेशन सुरु राहणार आहे. लोकसभा सचिवालायाने प्रसिद्धीपत्रक जारी करत अधिवेशनाची तारीख जाहीर केली आहे. या अधिवेशनात विरोधी पक्ष कोणकोणत्या मुद्द्यावरून केंद्र सरकारला घेरणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

SD Social Media

9850 60 3590

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

scroll to top
error: आपल्याला माहिती कॉपी करण्याची परवानगी नाही.