बॉलिवूड आणि टीव्ही अभिनेते अनुपम श्याम यांचं निधन झालं आहे. ते 63 वर्षांचे होते. गेल्या काही दिवसांपासून अनुपम श्याम यांच्यावर मुंबईतील खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते. काल उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली. ज्येष्ठ अभिनेते अनुपम श्याम यांनी मन की आवाज प्रतिज्ञा या शोमध्ये ठाकूर सज्जन सिंगच्या भूमिका निभावली होती. काही दिवसांपूर्वी त्यांना मूत्रपिंडाशी संबंधित आजार उद्भवला होता. त्यामुळे त्यांना मुंबईतील लाईफ लाईन हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते.
त्यांच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू होते. मात्र, उपचारादरम्यान त्यांचे अवयव निकामी झाले. त्यामुळे दोन दिवस हे व्हेंटिलेटरवर होते. काल रात्री उपचारादरम्यान त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनामुळे टीव्ही इंडस्ट्रीवर शोककळा पसरली आहे. दुर्दैवीची बाब म्हणजे, अनुपम श्याम यांना मागील एका महिन्यापासून रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. पण, त्यांच्या उपचारासाठी अनुपम यांच्या भावाने इंडस्ट्रीतील लोकांकडे मदत मागितली होती. डायलिसिस झाल्यानंतर त्यांची तब्येत अचानक बिघडली. अनुपम श्याम हे गोरेगावमधील लाइफलाइन रुग्णालयात दाखल झाले होते.
अनुपम यांची गेल्या 6 महिन्यांपासून तब्येत खालावली होती. त्यांच्या मूत्रपिंडात संसर्ग झाला होता. ज्यामुळे त्यांना हिंदूजा रुग्णालयात भरती करण्यात आलं होतं. तेथे दीड महिन्यापर्यंत त्यांच्यावर उपचार सुरू होते. त्यांना वारंवार डायलिसिस करण्याचा सल्ला देण्यात आला होता. डायलिसिसमध्ये खूप खर्च झाल्यामुळे त्यांनी आयुर्वेदिक उपचार करण्याचा निर्णय घेतला. मात्र, आयुर्वेदिक उपचाराचा काहीच उपयोग झाला नाही. त्यानंतर डायलिसिस न केल्यामुळे त्यांच्या छातीत पाणी जमा झाले होते. त्यानंतर डायलिसिस पुन्हा सुरू केले तेव्हा त्यांना बरं वाटतं होतं. दरम्यानच्या काळात अनुपम श्याम यांच्या उपचारासाठी त्यांच्या कुटुंबाने इंडस्ट्रीतील लोकांकडे विशेषत: आमिर खान आणि सोनू सूदकडे मदत मागितली होती. मात्र, मनोज वाजपेयी अनुपम श्याम यांना मदतीचा हात दिला होता. त्याने एक लाख रुपयांची मदत दिली होती.