शिवसेना-भाजप युती तोडण्याचा निर्णय हा एकनाथ खडसेंचा नव्हता तर हा निर्णय भारतीय जनता पार्टीच्या सामूहिक निर्णय होता त्यात देवेंद्र फडणवीस सारखे नेते होते भाजप केंद्र सरकारची मान्यता या निर्णयाला होती, असा खुलासा करत राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांनी मंत्री गुलाबराव पाटील यांच्यावर जोरदार पलटवार केला.शिवसेनेसोबत युती तोडणाऱ्या एकनाथ खडसे यांच्यासोबत कसे बसतात, असा सवाल विचारत शिंदे गटाचे मंत्री गुलाबराव पाटील यांनी खडसेंवर टीका केली होती. त्यांच्या या टीकेला खडसेंनी जशाच तसे उत्तर दिले.
‘मला भाजप-सेना युती तोडल्याचा आरोप करणार्यांनी हे. लक्षात घ्यावे की, युती तोडण्याचा निर्णय आधीच झालेला होता. फक्त घोषणा करण्याचे काम आपण केले ‘ अशा शब्दांमध्ये एकनाथ खडसे यांनी गुलाबराव पाटील यांनी ठणकावले
तसंच, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी राज्य सरकार विकास कामे संथ गतीने सुरू असल्याचा जो आरोप केला आहे त्या आरोपांशी आपण सहमत आहोत असं एकनाथ खडसे यांनी म्हटलं आहे.