महाराष्ट्रात कोरोना आणि ओमिक्रॉन वेरियंटचे रुग्ण वाढत असल्याचं समोर आलं आहे. राज्यात कोरोनाचा कहर सुरु असल्याचं पाहायला मिळत आहे. दिवसेंदिवस कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढतेय. राज्यात दिवसभरात 43 हजार 211 नवे रुग्ण आढळून आले आहेत. तर, 19 जणांचा मृत्यू झाला आहे. काल राज्यात 238 ओमिक्रॉन रुग्णांची नोंद झालीय.सर्वाधिक 197 रुग्णांची पुण्यात नोंद झालीय.
आतापर्यंत राज्यात 1605 ओमिक्रॉन रुग्णांची नोंद झालीय.859 जणांना आतापर्यंत डिस्चार्ज मिळाला आहे. पुण्याच चोवीस तासात 10 हजार 76 कोरोना रुग्ण आढळले असून 2 जणांचा मृत्यू झाला आहे. पुणे जिल्ह्यातील ही गेल्या तीन महिन्यातील सर्वाधिक वाढ असल्याची माहिती आहे. जिल्ह्यातील सक्रिय रुग्णसंख्या 50 हजारांच्यावर गेल्याचं कळतंय. दरम्यान, गुरुवारच्या तुलनेता राज्यातील कोरोना रुग्णसंख्येत आणि मृतांच्या संख्येत घट नोंदवण्यात आली आहे.
पुणे जिल्ह्यात कोरोनाचा कहर, गेल्या 24 तासात रुग्णसंख्या दहा हजारापार दिवसभरात वाढले 10 हजार 76 रुग्ण, 2 जणांचा झाला मृत्यू जिल्ह्यातील सक्रीय रुग्णसंख्या पुन्हा 50 हजारावर ! तीन महिन्यांतील सर्वात उच्चांकी वाढ !
नंदुरबार जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्याही दिवसेंदिवस वाढत असून. नंदुरबार शहर आणि तालुका कोरोनाचा हॉस्पॉट बनला आहे. काल एका दिवशी तब्बल 149 रुग्ण पॉझिटिव्ह आल्याने जिल्हा प्रशासनाची परत एकदा डोकेदुखी वाढायला सुरुवात झाली आहे.