जिओने 6G वर आधीच सुरू केले काम

जिओने अद्याप भारतात 5G सेवा सुरू केलेली नसताना, जिओची उपकंपनी एस्टोनियाने आधीच 6G वर काम सुरू केले आहे. Jio एस्टोनियाने जाहीर केले आहे की ते 6G नेटवर्क्स एक्सप्लोर करण्यासाठी औलू विद्यापीठासोबत काम करणार आहेत. जे भविष्यातील वायरलेस एंड-टू-एंड सोल्यूशन्स वापरकर्त्यांच्या आवश्यकता लक्षात घेऊन विकसित करण्यात येतील. 6G चा स्पीड 5G पेक्षा 100 पट जास्त असेल.

कंपनीने या प्रोजक्टबाबत अद्याप स्पष्ट केलेल नसले तरी म्हटले की, “ही भागीदारी 3D कनेक्टेड इंटेलिजन्स उद्योग आणि शैक्षणिक दोन्ही क्षेत्रात हवाई आणि अंतराळ संशोधन, होलोग्राफिक बीमफॉर्मिंग, सायबर सुरक्षा, मायक्रो-इलेक्ट्रॉनिक्स आणि फोटोनिक्स क्षेत्रात क्रांती घडवून आणेल.

“6G नेटवर्क 5G पेक्षा 100 पट जास्त वेगवान आहे, याचा अर्थ डेटा डाऊनलोडिंगचा स्पीड 1,000 Gbps इतका जास्त असेल.

Jio 6G मुळे उत्पादन, संरक्षण आणि औद्योगिक यंत्रसामग्री क्षेत्राचा विकास होईल. 6G चा वेग 5G पेक्षा 100 पट जास्त असेल. असे मानले जाते त्यामुळे सॅमसंगने या पुढील पिढीच्या नेटवर्कसाठी 1,000 Gbps पर्यंत इंटरनेटच्या स्पीडची गरज असल्याचे म्हटले आहे. ज्यावर संशोधन आणि विकास चीन आणि जर्मनी सारख्या देशांमध्ये आधीच सुरू झाला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

scroll to top
error: आपल्याला माहिती कॉपी करण्याची परवानगी नाही.