शिख नेते रिपुदमन यांची निर्घृण हत्या; एअर इंडिया फ्लाईट ब्लास्टप्रकरणात आलेलं नाव

कॅनडातील व्हँकुव्हरमध्ये शीख नेते रिपुदमन सिंग मलिक यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. ही घटना गुरुवारी रात्री उशिरा घडली. त्यांना गोळी का मारण्यात आली, हे अद्याप समजू शकलेलं नाही. दुचाकीवर आलेल्या तरुणांनी त्यांच्यावर हल्ला केला. नंतर पुरावा नष्ट करण्यासाठी त्यांची कार जाळली.

1985 च्या कनिष्क बॉम्बस्फोट प्रकरणात निर्दोष सुटलेले कॅनडाचे शीख नेते आणि पंजाबी वंशाचे व्यापारी रिपुदमन सिंग मलिक यांची कॅनडातील सरे येथे गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. ते त्यांच्या कारमधून जात असताना त्यांचा मृत्यू झाला. वाटेत दुचाकीस्वार तरुणांनी त्यांची गोळ्या झाडून हत्या केली.

रॉयटर्सच्या वृत्तानुसार, पोलिसांचं म्हणणे आहे की जवळून गोळीबार करण्यात आला आहे. यात रिपुदमनचा जागीच मृत्यू झाला. रिपुदमनचं नाव 1985 च्या एअर इंडिया फ्लाइट बॉम्बस्फोटात आलं होतं, परंतु नंतर 2005 मध्ये या खटल्यातून त्यांची निर्दोष मुक्तता करण्यात आली.

22 जून 1985 रोजी एअर इंडियाच्या विमानाने कॅनडाहून दिल्लीला उड्डाण केलं. आयरिश एअर स्पेसमध्ये या विमानाचा स्फोट झाला आणि विमानातील 22 क्रू सदस्यांसह 331 प्रवासी मरण पावले. त्यापैकी बहुतांश भारतीय वंशाचे कॅनडाचे नागरिक होते.

स्फोटाच्या वेळी विमान लंडनच्या हिथ्रो विमानतळापासून ४५ मिनिटांच्या अंतरावर होतं. कॅनडामध्ये राहणारे शीख नेते रिपुदमन सिंग मलिक यांना या प्रकरणात आरोपी मानलं जात होतं. घटनेच्या 20 वर्षांनंतर ते निर्दोष ठरले आणि 2005 मध्ये त्यांची निर्दोष मुक्तता झाली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

scroll to top
error: आपल्याला माहिती कॉपी करण्याची परवानगी नाही.