टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहलीने तिसऱ्या वनडे सामन्यात चांगली फलंदाजी केली. मात्र त्याच्या एका चुकीमुळे तो सोशल मीडियावर ट्रोल होतोय. विराटने केलेल्या या कृत्यावर सर्वजण संतापले आहेत. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या तिसऱ्या वनडे सामन्यापूर्वी विराट कोहलीने राष्ट्रगीतादरम्यान केलेल्या कृत्यामुळे अनेकांनी संताप व्यक्त केला आहे.
दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या तिसऱ्या वनडे सामन्यादरम्यान विराट कोहली हे कृत्य करताना कॅमेऱ्यात कैद झाले. सामन्यापूर्वी राष्ट्रगीत सुरू असताना विराट कोहली च्युइंगम चघळताना दिसला. या घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होतोय.
कोहलीच्या या कृत्याने राष्ट्रगीताचा अपमान झाल्याबद्दल चाहत्यांनी त्याला सोशल मीडियावर प्रचंड ट्रोल केलंय. कर्णधारपदाच्या जबाबदारीतून मुक्त झाल्यानंतर विराटचं हे वागणं फॅन्सना आवडलेलं नाही. यामुळे विराट कोहलीवर चाहते चांगलेच नाराज झालेत. अनेकांनी बीसीसीआयकडे विराटवर कारवाई करण्याची मागणीही केली.
सामन्यादरम्यान क्रिकेटप्रेमी आणि विराटच्या चाहत्यांना एक गोड बातमी मिळाली. सामना सुरु असताना चक्क विराट आणि अनुष्काची मुलगी वामिका दिसली. लाईव्ह मॅचचं प्रक्षेपण सुरू असताना त्याचवेळी कॅमेऱ्यामनची नजर अनुष्कावर गेली. अनुष्काच्या कडेवर लहान मुलगी दिसत आहे. ती वामिका असल्याचं सांगितलं जातंय. सोशल मीडियावर तिचे फोटो व्हायरल होत आहेत.
दरम्यान अनुष्का किंवा विराटने मात्र वामिकाचा चेहरा दिसणारा एकही फोटो अजून सोशल मीडियावर शेअर केला नाही. अनुष्काच्याकडेवर वामिका गुलाबी रंगाच्या ड्रेसमध्ये दिसत आहे. वामिकाला पाहून चाहत्यांनाही खूप आनंद झाला आहे.