झी मराठीवरील ‘चला हवा येऊ द्या’ या शोमध्ये झळकणा-या साध्या भोळ्या भाऊ कदम यांनी आपल्या विनोदी टायमिंगने महाराष्ट्राला पोटधरुन हसायला भाग पाडलं आहे. खरं तर भाऊ यांना खरी ओळख मिळवून दिली ती झी मराठी वाहिनीच्या ‘फू बाई फू’ या कार्यक्रमाने.
याचबरोबर सध्या भाऊ कदम, कुशल बद्रिके आणि सोनाली कुलकर्णी यांचा ‘पांडू’ हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. या सिनेमाला प्रेक्षकांनी डोक्यावर घेतलं. अनेक ठिकाणी या सिनेमाचे हाऊस फुल्लचे बोर्ड पहायला मिळाले. या सिनेमाचं प्रमोशनदेखील दणक्यात सुरु आहे. नुकतीच झी मराठी वाहिनीवरील ‘होम मिनीस्टर’ या कार्यक्रमात भाऊ कदमसह त्याच्या कुटूंबाने हजेरी लावली. जरी आज भाऊ यांनी यशाचा शिखरं गाठला असला तरी हे शिखर गाठण्यासाठी भाऊ यांना खूप वाईट दिवसांचाही सामना करावा लागला. यावेळी भाऊ यांच्या कुटूंबाने त्यांचं भरभरुन कौतूक केलं
मुख्य म्हणजे या कार्यक्रमात भाऊ कदम यांच्या सासूने भाऊ यांचं खूप कौतूक केलं यावेळी बोलताना त्यांच्या डोळ्यात पाणी दाटलं होतं. कार्यक्रमा दरम्यान भाऊ यांच्या सासू भावूक होत म्हणाल्या, ” खूप अभिमान आहे मला. बघून बरं वाटतं. याचबरोबर आदेश बांदेकर यांनी भाऊ कदम यांच्या सासूला विचारलं ” काय बघितलं तुम्ही मुलामध्ये, तेव्हातर नोकरी नव्हती त्याच्याकडे. यावंर भाऊ यांच्या सासू म्हणाल्या त्यांचा स्वभाव आणि व्यक्तिमत्व बघून बरं वाटलं माझ्या नवऱ्यानेही स्वभाव बघून होकार दिला ताबडतोब. यावंर आदेश बांदेकर म्हणतात, भाऊ तुमच्या खिशाकडे नं बघता माणसातल्या माणूसकीकडे पाहून विश्वास ठेवला.” याचबरोबर खूप आर्शिवादही या माऊलीने यावेळी भाऊ यांना दिले.