राष्ट्रीय स्वयंसेवक संघ कडे
सरकारचा रिमोट नाही : मोहन भागवत
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रमुख मोहन भागवत यांनी शनिवारी हिमाचल प्रदेशातील धर्मशाला येथे माजी सैनिकांना संबोधित केले. यावेळी ते म्हणाले, आमचे काही कार्यकर्ते नक्कीच सरकारचा भाग आहेत, परंतु त्यामुळे संघाला रिमोट कंट्रोल म्हणण्यात काहीही सत्य नाही. तसेच भारत ही जागतिक महासत्ता नसली तरी महामारीनंतरच्या काळात भारतात विश्वगुरू बनण्याची क्षमता नक्कीच आहे”, असंही मोहन भागवत म्हणाले.
माध्यमे आपल्याला सरकारचे रिमोट कंट्रोल म्हणून संबोधतात, परंतु ते खरं नाही. आमचे काही कार्यकर्ते सरकारचा भाग आहेत.
आईचा गर्भ आणि कबर ही दोनंच सुरक्षित ठिकाणं; हृदयद्रावक चिठ्ठी लिहून पीडितेची आत्महत्या
अकराव्या वर्गात शिकणाऱ्या एका विद्यार्थिनीने लैंगिक छळ झाल्यामुळे आत्महत्या केली. ही घटना चेन्नईच्या पूनमल्ली भागात घडली. या मुलीनं एक भावनिक चिठ्ठी लिहिली आहे. पीडितेच्या घरात सापडलेल्या सुसाईड नोटवरून पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत. या मुलीनं सुसाईड नोटमध्ये “आईचा गर्भ आणि कबर ही दोनच सुरक्षित ठिकाणे आहेत,” असं लिहिलंय. ही मुलगी सरकारी शाळेत अकराव्या वर्गाची विद्यार्थिनी होती. आई घराबाहेर पडल्यानंतर तिने आत्महत्या केली.
पुतळ्याच्या विटंबनाप्रकरणी
पंतप्रधान गप्प का आहेत?
बंगळूरु येथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याची विटंबना झाल्याने शिवसेना आक्रमक झाली असून राज्यभरात निषेध केला जात आहे. मुंबईतही ठिकठिकाणी शिवसैनिकांकडून निषेध आंदोलन केलं जात आहे. दादरमध्ये एकीकडे शिवसैनिकांची पोलिसांसोबत झटापट झाली तर दुसरीकडे लालबागमध्येही शिवसेनेकडून आंदोलन करण्यात आलं. यावेळी शिवसेना खासदार अरविंद सावंत यांनी भाजपा नेत्यांवर जोरदार टीका केली. यावेळी त्यांनी पंतप्रधान गप्प का आहेत? अशी विचारणा केली.
हेमा मालिनीच्या गालासारखे
माझ्या गावातील रस्ते : गुलाबराव पाटील
नगरपंचायत निवडणुकीच्या प्रचाराच्या अंतिम टप्प्यात शिवसेना नेते गुलाबराव पाटील यांनी सभा घेतली. या सभेत आपल्या मतदारसंघातील रस्ते आपण हेमा मालिनींच्या गालासारखे केले असल्याचं वक्तव्य त्यांनी केलंय. माझं आव्हान आहे ३० वर्ष राहिलेल्या आमदाराला, माझ्या धरणगावला या आणि तिथले रस्ते पाहा. सगळे रोड-रस्ते अभिनेत्री हेमा मालिनीच्या गालासारखे आहेत. जर रस्ते तसे नसतील तर राजीनामा देऊन टाकेन. महाराष्ट्राला ज्ञान काय शिकवताय, पहिले बोदवडचा रस्ता तरी चांगला करा.
अंदमान निकोबार बेटांवर
100% लसीकरण पूर्ण
ओमायक्रनने चिंता वाढवली असताना संपूर्ण देशातून एक चांगली आणि मोठी बातमी आहे. अंदमान निकोबार बेटांवर 100% लसीकरण पूर्ण झालं आहे. अंदमान आणि निकोबार बेटे हा पहिला केंद्रशासित प्रदेश बनला आहे ज्याठिकाणी प्रथम लसीकरण पूर्ण झालंय. जगाच्या अतिदुर्गम भागात असलेल्या केंद्रशासित प्रदेशाच्या प्रशासनाने हे विलक्षण पराक्रम साध्य करण्यासाठी अतुलनीय अडचणींवर मात केलीये.
अंदमान आणि निकोबार बेटांवर 16 ऑगस्ट 2021 रोजी लसीकरण मोहीम सुरू झाली. वैद्यकीय कर्मचारी आणि फ्रंटलाईन वर्कर्सना लसीचा डोस देण्यात आला.
‘हाय रिस्क’ देशांच्या यादीत
ब्रिटनचाही समावेश
जर्मनीच्या आरोग्य व्यवस्थापनाने रात्री उशिरा हे घोषित केलं की आता ब्रिटनचाही समावेश ‘हाय रिस्क’ देशांच्या यादीत करण्यात येत आहे. म्हणजेच जर्मनीमध्ये आता ब्रिटनमधून येणाऱ्या प्रवाशांवरही कठोर बंधनं लादण्यात येणार आहेत. ब्रिटीश राजधानी असलेल्या लंडनचे मेयर सादिक खान यांनी परिसरातला ओमायक्रॉनचा प्रादुर्भाव पाहता ही गंभीर बाब असल्याचं सांगत त्या परिस्थितीला चिंताजनक घोषित केलं. जर्मनी सरकारने ब्रिटनचा समावेश हाय रिस्क देशांच्या यादीत केला आहे.
प्रचारसभेत पंकजा मुंडे यांनी केले
फडणवीसांच्या संयमाचं कौतुक
प्रचारसभेत बोलताना पंकजा मुंडे यांनी फडणवीसांच्या संयमाचं कौतुक करताना सांगितलं की, “काही लोक फडणवीसांकडे जागा वाटपासाठी गेले होते. ५०-५० टक्के जागा मागत होते. फडणवीसांनी संयम दाखवला. त्यांच्याकडून संयम शिकण्यासारखा आहे”. पुढे बोलताना त्यांनी सांगितलं की, “ मी एक फॉर्म्युला दिला. मी म्हटलं ५० टक्के जागा दिल्या तर समोरच्याच विजय होत असतो. एकाला आष्टीत आणि दुसऱ्याला पाटोद्यात उभं करा. शिरुरमध्येही युती करा, असं मी सुचवलं”.
उद्धव ठाकरेंचे आदेश आहेत
म्हणून सहन करतोय
शिवसेनेचे खासदार हेमंत पाटील यांनी आपल्या मनातील ही खदखद बोलून दाखवली असून महाविकास आघाडीत शिवसैनिकांचं नुकसान होत असल्याचं म्हटलं आहे. शिवसैनिकांचा वापर केला जात असून फक्त उद्धव ठाकरेंचे आदेश आहेत म्हणून आपण हे सहन करतोय असं हेमंत पाटील यांनी स्पष्ट शब्दांत सांगितलं आहे. काही दिवसांपूर्वी काँग्रेस नेते अशोक चव्हाण यांनी आम्ही आहोत म्हणून सत्ता आहे असं म्हटलं होतं. त्यांच्या या वक्तव्याव प्रतिक्रिया देताना हेमंत पाटील यांनी हे वक्तव्य केलं आहे.
नेहरू जी कह गए इंदिरा से
ऐसा पोता आएगा
एका टीव्ही डिबेटमध्ये भाजपा प्रवक्त्याच्या गाण्यावर काँग्रेसच्या प्रवक्त्याला हसू आवरले नाही. महत्वाचं म्हणजे या भाजपा नेत्यानं काँग्रेस नेते राहुल गांधींवर टीका केली होती. लाइव्ह टीव्ही डिबेटमध्ये, भाजपाचे प्रवक्ते गौरव भाटिया यांनी राहुल गांधींची खिल्ली उडवली आणि ‘नेहरू जी कह गए इंदिरा से ऐसा पोता आएगा, कैम्पेन करेगा कांग्रेस की और भाजपा को जितवाएगा’, असं गाणं म्हटलं. भाटियांचं हे गाणं ऐकून काँग्रेसचे प्रवक्तेही हसू लागले.
पुण्यातल्या प्रसिद्ध हॉटेल वैशालीचे
मालक जगन्नाथ शेट्टी यांचे निधन
पुण्यातल्या फर्ग्युसन रस्त्यावर असलेल्या प्रसिद्ध हॉटेल वैशाली आणि रुपालीचे मालक जगन्नाथ शेट्टी यांचं वृद्धापकाळाने निधन झालं आहे. ते ९१ वर्षांचे होते. डेक्कनच्या प्रयाग हॉस्पिटलमध्ये त्यांच्यावर उपचार सुरु होते. त्यांच्या पश्चात मुलगी, जावई आणि नातवंड असा परिवार आहे. जगन्नाथ शेट्टी यांचा जन्म कर्नाटकातल्या ओणिमजालू या गावातला होता. वयाच्या १३ व्या वर्षी नातेवाईकासोबत ते कर्नाटकातून महाराष्ट्रात आले.
SD social media
9850 60 3590