मुंबईत 18 विद्यार्थी पॉझेटिव्ह, सात दिवसांसाठी शाळा बंद

कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्यामुळे शालेय शिक्षण विभागाने राज्यातील शाळा सुरु करण्याचा निर्णय घेतला. मात्र, शाळा सुरु होऊन काही दिवस उलटत नाही तोच नवी मुंबईतील घणसोली येथील शेतकरी शिक्षण संस्थेची शाळा सात दिवसांसाठी बंद ठेवण्याचा निर्णय पालिका आयुक्तांना घ्यावा लागला आहे.

या शाळेत अकरावीमध्ये शिकणाऱ्या एका विद्यार्थ्यांचे पालक कतार देशातून आले होते. त्यांची कोरोना टेस्ट केल्यावर त्यांचे अहवाल पॉझेटिव्ह आले. यामुळे खबरदारी म्हणून वर्गातील इतर विद्यार्थ्यांची कोरोना चाचणी करण्यात आली. या चाचणीत १६ विद्यार्थी पॉझेटिव्ह आले होते. तर, आज आणखी दोन विद्यार्थी पॉझेटिव्ह आले.

शाळेतील एकूण १८ विद्यार्थी पॉझेटिव्ह आल्यामुळे ही शाळा सात दिवसासाठी बंद ठेवण्याचा निर्णय महापालिका आयुक्तांनी घेतला आहे. हि वाढती संख्या पाहून पालक, शिक्षक आणि विद्यार्थ्यामध्ये चिंतेचे वातावरण आहे. आज शाळेतील शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी अशा १०२ जणांची कोरोना टेस्ट केली. तसेच पालक आणि विद्यार्थीची टेस्ट करण्यात येत आहे.

शेतकरी शिक्षण संस्थेत पाचवी ते १२ इयत्तेपर्यत १६५५ विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. आतापर्यंत ८१५ विद्यार्थ्यांची टेस्ट करण्यात आली असून सर्व मुलांची टेस्ट केली जाणार आहे. सध्या पॉझेटिव्ह विद्यार्थ्यांना महापालिकेच्या कोरन्टीन सेंटरमध्ये ठेवण्यात आले आहे, असे पालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी सांगितले.

दरम्यान, या प्रकाराने शाळेतील विद्यार्थी आणि पालक भयभीत झाले आहेत. त्यांनी शाळा ऑन लाईन घ्यावी अशी मागणी केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

scroll to top
error: आपल्याला माहिती कॉपी करण्याची परवानगी नाही.