कोरोनाचे सावट कमी होत असतानाच आता पुन्हा नव्याने कोरोना रुग्णांच्या संख्येत भर झालेली पाहायला मिळत आहे. असे असतानाच बॉलिवूडमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव वाढतो आहे. नुकतच अभिनेत्री करीना कपूर आणि अमृता अरोरा यांना कोरोनाची लागण झाल्याचे वृत्त समोर आले. आणि आता आलिया भटने कोरोना नियम झुगारत दिल्लीला गेल्याचे कळत आहे.
करण जोहरने आयोजित केलेल्या पार्टीनंतर करीना कपूर हिला कोरोना झाल्याचे वृत्त समोर आले. पार्टीतील करिना आणि करिष्मा कपूरसह चार जणांना कोरोनाची लागण झाली होती. या पार्टी आलिया भट्टदेखील सहभागी झाली होती त्यामुळे तरी ती एका हाय रिस्क कोविड 19 संसर्ग बाधीत रुग्णाच्या संपर्कात आली असल्यामुळे तिला होम क्वारंटाईन रहाण्याचं बंधन बीएमसीने दिलं होतं. मात्र तरी ही आलिया भट्ट बीएमसीच्या नियमांचे उल्लंघन करत शुटींगसाठी दिल्लीला मुंबईहून चार्टर प्लेनने गेली. ‘ब्रह्मास्त्र’ सिनेमाचे मोशन पोस्टर प्रदर्शित होण्यापूर्वी आलियाने दिल्लीतील गुरुद्वाराला भेट दिली त्यामुळे आलीया ‘सुपर स्प्रेडर’ असल्याचे सोशल मीडियावर म्हटले जात आहे.
बॉलिवूडमध्ये सध्या कोरोनामुळे भितीचे वातावरण आहे. संजय कपूरची पत्नी महीप कपूर आणि सोहेल खानची पत्नी सीमा खानलादेखील कोरोनाची लागण झाली होती. त्यानंतर सलमान खानचा भाऊ अभिनेता सोहेल खानचा मुलगा योहान खानलादेखील कोरोनाची लागण झाली आहे. तसेच अभिनेता संजय कपूरची पत्नी महीप कपूरनंतर आता त्यांची मुलगी शनाया कपूरलादेखील कोरोनाची लागण झाली आहे. शनायाने स्वतः सोशल मीडियाच्या माध्यमातून कोरोनाची लागण झाल्याचे सांगितले आहे.