पुढील आठवड्यात थंडीचं प्रमाण आणखी वाढेल, असा हवामान खात्याचा अंदाज आहे. दोन-तीन अंश डिग्री सेल्सिअस तापमानात घट होईल. पुढील आठवड्यात 10-11 डिग्री सेल्सिअसपर्यंत कमी तापमान होईल, असा अंदाज आहे. तर जास्तीत-जास्त तापमान 28 डिग्री सेल्सिअस राहण्याची शक्यता आले. आकाश निरभ्र राहील, असा हवामान खात्याचा अंदाज आहे. आतापर्यंत पडते तशी थंडी पडली नव्हती. पण, गेल्या दोन दिवसांत विदर्भातील तापमानात घसरण झाली. त्यामुळं खऱ्या अर्थानं थंडीला सुरुवात झाली म्हणता येईल. ढगाळ वातावरणानं तापमानात घसरण होत आहे. उबदार कपड्यांची गरज भासू लागली आहे.
विदर्भात जसा उन्हाचा पारा वाढतो. तशाच थंडीत पारा कमी होतो. यंदा डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यापासून थंडीला (cold) सुरुवात झाली. पण, आता तिसऱ्या आठवड्यात खऱ्या अर्थानं थंडी पडू लागली. उनीचे कपडे बाहेर काढावे लागलेत. गडचिरोलीत तर काल पारा 12.6 अंशांपर्यंत खाली गेला होता. त्यामुळं तिथं कुल्लू मनालीत राहत असल्याचा आनंद लुटता आला.
नागपुरातही पारा 13.6 अंशांपर्यंत खाली आला. आणखी दोन दिवसांत पाऱ्यात घसरण होणार असल्यानं विदर्भवासींयांना थंडीपासून बचावासाठी उनीच्या कपड्यांचा वापर वाढवावा लागणार आहे.
गेल्या दोन दिवसांत किमान तापमानात घसरण झाली. बुधवारी सायंकाळपासून गारठा वाढायला लागलाय. विदर्भात 12.6 अंश तापमान गडचिरोलीचे होते. नागपूर शहराचे किमान तापमान 13.6 अंश नोंदविले गेले. जम्मू काश्मीर परिसरात वेस्टर्न डिस्टरबन्स व सायक्लोनिक सर्क्युलर तयार झालंय. हरियाणातही सायक्लोनिक सर्क्युलर तयार झालंय. उत्तरेकडील हवामानाचा विदर्भावर परिणाम जाणवत आहे. गेल्या दोन दिवसांपासून आकाश निरभ्र आहे. त्यामुळं थंडी वाढायला लागली आहे. विदर्भातील काही भागात किमान तापमानापेक्षा एक ते तीन अंशांची घट होणार आहे. दिवसातील तापमानातही घट होईल. गेल्या दोन दिवसांत किमान तापमानात घसरण झाली आहे. बुधवारी सायंकाळी सहापासून थंडीचा जोर वाढायला लागला आहे. शिवाय दिवसाच्या तापमानातही घट झाली आहे.