नोबेल शांतता पुरस्कारासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे नाव विचारात नाही असे स्पष्टीकरण नोबेल समितीचे उपनेते अॕस्ले तोए यांनी गुरुवारी दिले. ते भारताच्या दौऱ्यावर आहेत. एका वृत्तसंस्थेशी बोलताना, तोए यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी युक्रेन-रशिया युद्धासंबंधी घेतलेल्या ‘हे युग युद्धाचे नाही’ या भूमिकेची प्रशंसा केली. मोदी यांचे हे विधान आशा दर्शवते, जागतिक विवाद कसे मिटवू नयेत याबद्दल भारताने सूचक संदेश दिला आहे. तसेच जगाच्या लोकसंख्येचा एक मोठा भाग मोदींच्या पाठीशी आहे असे ते म्हणाले.
तोए यांच्या या विधानांचा विपर्यास करत काही वृत्तवाहिन्यांनी, शांततेसाठी नोबेल पुरस्कारासाठी नरेंद्र मोदी प्रबळ दावेदार असल्याचे वृत्त दिले. अखेर तोए यांनी त्याचे खंडन करून या सर्व अफवाच असल्याचे स्पष्ट केले. मी असे किंवा तत्सम काहीही म्हणाले नाही अशा शब्दांमध्ये त्यांनी यासंबंधी अफवांचे खंडन केले. या अफवांवर चर्चा करू नये तसेच त्याला जास्त महत्त्वदेखील देऊ नये असे आवाहन त्यांनी केले. मी येथे नॉर्वेजियन नोबेल समितीचा उपनेता म्हणून आलेलो नाही, मी येथे आंतरराष्ट्रीय शांतता संघटनेचा संचालक आणि भारताचा मित्र म्हणून आलो आहे असे त्यांनी स्पष्ट केलेय.