बॉलिवूड अभिनेत्री विद्या बालन सध्या आपल्या आगामी ‘शेरनी’ चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. या चित्रपटात ती वन अधिकार्याची भूमिका साकारत आहे. विद्या सोशल मीडियावर खूप अॅक्टिव आहे, ती अनेकदा तिचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करते. आता तिनं तिच्या इन्स्टाग्रामवर साडीमधील अनेक फोटो शेअर केले आहेत.
विद्यानं तिच्या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी एक अनोखी स्टाईल कॅरी केली. ती प्रत्येक कार्यक्रमात सिंह किंवा अॅनिमल प्रिंटशी संबंधित आउटफिटमध्ये दिसली. नुकतंच ती सिंहाच्या चेहर्याची प्रिंट असेली साडी परिधान करुन दिसली.
चाहत्यांना तिची ही स्टाईल प्रचंड आवडली आहे. फोटो शेअर करताना विद्यानं ‘मूड ऑल डे’ असं कॅप्शन दिलं.
या प्रिंटेड साडीमध्ये विद्या खूपच सुंदर दिसत आहे.
तिच्या साडीत मल्टी कलर प्रिंट डिझाईन देण्यात आली आहे. साडीच्या पदरावर टायर प्रिंट आहे. तिनं आपला लूक साधा ठेवला आहे. या साडीसोबत तिनं कमी मेकअप केलं आहे..