अकोल्यात 50 वर्षीय आसिफ पठाण यांची हत्या करण्यात आली आहे. दगडाने ठेचून त्यांची हत्या करण्यात आली आहे. शहरातल्या भागवाडी येथील रहिवासी असलेल्या 50 वर्षीय आसिफ पठाण यांची शहरातल्या रामदास पेठ मधील वनविभाग कार्यालयाच्या बाजूला दगडाने ठेचून हत्या केली आहे.
अज्ञात व्यक्तीकडून ही हत्या झाल्याचं सांगितलं जात आहे. हत्येचं कारण अद्याप समोर आलेलं नाहीय. पण काही वैयक्तिक वाद होते का, आरोपी आणि मृत यांचं काही कनेक्शन होतं का?, नेमकी कोणत्या कारणाने ही हत्या केलीय? या दिशेने पोलिसांनी तपास सुरु केला आहे.
हत्येची बातमी पोलिसांना कळताच घटनास्थळी रामदास पेठ पोलीस, सिटी कोतवाली पोलीस, SDO ,LCB पोलीस तर घटनास्थळी दाखल झाले असून पुढील तपास रामदासपेठ पोलीस करत असून आरोपीचा शोध सुरु आहे.
दुसरीकडे, हिंगोली जिल्ह्यात लाचप्रकरणी पीएसआय एसीबीच्या सापळ्यात अडकलाय. ऐन दिवाळीत महिनाभर पत्याचा क्लब सुरू ठेवण्यासाठी 10 हजाराची लाच मागितल्याने सेनगाव तालुक्यातील गोरेगाव पोलीस ठाण्यातील पोलीस उपनिरीक्षक मारोती नंदे याला लाच स्विकारतांना रंगेहाथ अटक केली आहे.
पीएसआय नंदे यांनी दहा हजार रुपयांची लाचेची मागणी तक्रार कर्त्याकडे केली होती. त्यातील तीन हजार रुपये स्वीकारल्यावर व उर्वरीत 7 हजार रुपये स्वीकारण्यास संमती देणाऱ्या पोलिस उपनिरीक्षक नंदे यांच्यावर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने गुन्हा दाखल केला आहे.