25 डावात किमान एक गडी बाद करण्याचा विश्वविक्रम राधाच्या नावे

भारतीय महिला क्रिकेट संघासाठी गेले काही दिवस चांगले नव्हते. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेत भारताला 1-4 असा पराभव स्वीकारावा लागला. त्यानंतर टी-20 मालिकेतही संघ 0-2 असा पिछाडीवर पडला. रविवारी झालेल्या दुसऱ्या सामन्यात आफ्रिकेने भारताला 6 गडी राखून मात दिली. त्यामुळे भारतीय महिला क्रिकेट संघाची कामगिरी अपेक्षेनुसार चांगली झाली नाही. मात्र, संघाची फिरकीपटू राधा यादवने टी-20 क्रिकेटमध्ये खास विक्रम आपल्या नावावर केले आहेत.

राधाने महिला टी-20 क्रिकेटमध्ये सलग 25 डावात किमान एक तरी गडी बाद करण्याचा विश्वविक्रम केला आहे. इतकेच नव्हे, तर ती टी-20 क्रिकेटमध्ये 50 गडी बाद करणारी जगातील तिसरी युवा गोलंदाज आणि भारताची पहिली गोलंदाज ठरली आहे. कारकिर्दीचा 36वा टी-20 सामना खेळत राधाने ही कामगिरी केली. आफ्रिकेची लीझेल ली ही राधाची 50वी विकेट ठरली.

नाहीदा अख्तर अग्रस्थानी

हा विक्रम करताना राधाचे वय 20 वर्ष 334 दिवस असे होते. सर्वात कमी वयात 50 फलंदाजांना माघारी धाडणाऱ्या महिला खेळाडूंच्या यादीत बांगलादेश संघाची नाहीदा अख्तर अग्रस्थानी आहे. तिने वयाच्या 20 वर्षातच हा कारनामा आपल्या नावावर केला होता. तर, दुसऱ्या स्थानी इंग्लंड संघाची महिला खेळाडू सोफी एक्लेस्टोन आहे. तिने हा 20 वर्ष आणि 300 दिवस असे वय असताना ही कामगिरी केली होती. सोफीने आतापर्यंत 42 सामन्यात 61 गडी बाद केले आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

scroll to top
error: आपल्याला माहिती कॉपी करण्याची परवानगी नाही.