इंटरनेटच्या जगात फेसबुक आणि इन्स्टाग्राफचा बोलबाला आहे. जगभरात २ अब्ज ८५ कोटींच्य़ा वर लोक फेसबुक वापरतात. भारतात फेसबुक वापरणाऱ्यांची संख्या तब्बल 34 कोटी आहे. इंटरनेटच्या या जगात सोशल माध्यमावरील अनेक प्रोफाईलवर आपण ‘ब्लू टिक’ बघतो. हे बघून अनेकांना आपल्या प्रोफाईलवर ‘ब्लू टिक’ असावी, अशी इच्छा असते. ही ‘ब्लू टिक’ म्हणजे त्या व्यक्तीचं सोशल मिडिया प्रोफाईल व्हेरीफाईड असून, त्यांचं समाजात मानाचं स्थान आहे, तो प्रतिष्ठित व्यक्ती आहे. असा त्याचा अर्थ मानला जातो.
त्यामुळेच अनेक जण सोशल मिडिया प्रोफाईलवर ‘ब्लू टिक’साठी शॉर्टकटचाही अवलंब करतात. सोशल मीडियावर वावरणाऱ्या दलालांसाठी हे आयतं सावज ठरण्याची शक्यता असते. काही घटनांवरुन असंत लक्षात येतं, की ‘ब्लू टिक’ मिळवून देण्यासाठी सोशल मीडियावर दलालही सक्रीय झाले आहेत. त्यांच्या मदतीने ब्लू टिक मिळविण्याचा प्रयत्न केल्यानंतर ही बाब फेसबूक, इन्स्टाच्या तंत्रज्ञ टिमला कळल्यास, संबंधित अकाऊंट कायमस्वरुपी ब्लॉक होण्याची आणि आर्थिक फसवणूक होण्याचीही भीती तज्ज्ञांकडून व्यक्त केली जात आहे.
माहिती आणि मनोरंजनासाठी आजच्या युवा पिढीचा सर्वाधीक भर फेसबुक, इन्स्टासारख्या सोशल माध्यमांवर आहे. यात व्यावसायिक, राजकीय नेते व प्रोफेशनल युजरचाही समावेश आहे. यात आता फेसबुकतर्फे दिल्या जाणाऱ्या व्हेरिफिकेशनची म्हणजेच ‘ब्लू टिक’ची भर पडली आहे. “सोशल माध्यमात ब्लू टिक मिळविणे मानाचे व प्रतिष्ठेचे समजले जाते. पण ही ब्लू टिक मिळविण्यासाठी फेसबुकच्या नियमानुसार नियमित चांगल्या, समाजहिताच्या पोस्ट, लेखनात सातत्य, मोठ्या प्रमाणात असलेले फाँलोअर्स, त्यांच्याकडून मिळणारी दाद, असे यूजर्स ‘ब्लू टिक’ मिळवण्यासाठी पात्र ठरतात.
परंतु अलिकडे ब्लू टिक मिळवून देण्यासाठी सोशल मिडियावरील दलाल सक्रीय झाले आहेत. कमी वेळात ब्लू टिक मिळविण्यासाठी धडपडणाऱ्या अपात्र यूजर्सला जाळ्यात ओढून, हे दलाल त्यांच्याकडून 30 हजार ते 1 लाखांपर्यंतची रक्कम घेत असल्याचे अनेक घटणांवरुन लक्षात येतं. पण पात्र नसतानाही ‘ब्लू टिक’ मिळवण्याचा प्रयत्न करणाऱ्यांची यात मोठी फसवणूक होण्याची शक्यता आहे.
फेसबुक, इन्स्टाची मोठी तांत्रिक टीम यूजर्सवर लक्ष ठेऊन असते. या टीमच्या लक्षात आल्यानंतर फेसबूक कायमचे संबंधित अपात्र यूजर्सला ब्लॉक करण्याची शक्यता आहे. विशेष म्हणजे सोशल मीडियावरील व्यक्ती राजकीय किंवा मोठा व्यावसायिक असल्यास त्याच्या प्रतिष्ठेलाही धक्का पोहोचतो. शिवाय ब्लू टिक मिळविण्यासाठी केलेला खर्च व्यर्थ जाण्याची जास्त शक्यता असेत”, असं मत सोशल मिडिया तज्ज्ञ अजित पारसे यांनी यावर व्यक्त केलं आहे.
फेसबुकवर व्हेरीफिकेशन :
• सर्वात आधी आपल्या फेसबूक पेजच्या सेटिंगवर जावं लागेल
• त्यानंतर जनरलवर क्लिक करुन पेज व्हेरिफिकेशनवर जा आणि एडीट क्लिक करा
• आता आपल्या फोन नंबरला क्लिक करा
• आता फोन नंबरला अँड करुन कन्टीन्युला क्लिक करा
• व्हेरिफिकेशन मॅसेज कोड पाहून कन्टीन्यूवर क्लिक करा
• यात आपली वैयक्तिक माहिती भरावी लागेल, त्यानंतर सेंड डॉक्युमेंटस वर क्लिक करा
• यानंतर फेसबूक आपले डॉक्युमेंटस तपासून ब्लू टिकबाबत निर्णय घेणार
भारतामध्ये किती जिल्हे आहेत जाणून घ्या :