नाशिक जिल्ह्यात कोरोना लसीकरणानंतर डॉक्टरचा मृत्यू

कोरोना लसीकरणानंतर डॉक्टरचा मृत्यू झाल्याने नाशिक जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. डॉ. स्नेहल लुणावत (वय 32) असे मृत डॉक्टरचे नाव आहे. विशेष म्हणजे ‘एईएफआय’ समितीच्या अहवालातही लसीकरणामुळे ही घटना घडल्याचा स्पष्ट उल्लेख करण्यात आला आहे.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, डॉ. स्नेहल लुणावत या इगतपुरीतील वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयात अध्यापन करतात. त्या दंतचिकित्सा हा विषय शिकवत असत. त्यांनी 28 जानेवरी रोजी कोरोना लस घेतली होती. कोरोना योद्धा म्हणून त्यांना प्राधान्याने लस देण्यात आली होती. मात्र, त्यानंतर त्यांना त्रास सुरू झाला. डॉक्टरांनी त्यावर काही औषधेही दिली. मात्र, त्यांची प्रकृती पुन्हा बिघडली. त्यांना औरंगाबाद येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथे त्यांच्यावर उपचार सुरू होते. मात्र, एक मार्च रोजी त्यांचा मृत्यू झाला. लसीच्या दुष्परिणामुळेच डॉ. स्नेहल यांचा मृत्यू झाल्याची तक्रार त्यांच्या कुटुंबाने शासनाकडे केली होती. लस कंपनीलाही तसे कळवले. मात्र, त्यांच्याकडून म्हणावा तसा प्रतिसाद मिळाला नाही.

लुणावत कुटुंबाचा केंद्र सरकारकडे वारंवार पाठपुरावा सुरू होता. त्यानंतर आता ‘एईएफआय’ समितीने अहवाल दिला आहे. त्या अहवालात असे म्हटले आहे की, डॉ. स्नेहल यांचा मृत्यू म्हणजे ‘सिरिअस अॅडव्हर्स इव्हेंट फॉलोइंग इम्युनायझेशन आहे.’ लसीकरणामुळे ही घटना घडल्याची नोंद असल्याचा निष्कर्ष उपलब्ध आहे. मात्र, त्या बदल होऊ शकतो, असा उल्लेखही करण्यात आला आहे. दरम्यान, डॉ. स्नेहल देशमुख यांचे वडील दिलीप लुणावत आहे औरंगाबमध्ये स्थायिक आहेत. ते एका कंपनीत मोठ्या पदावर कार्यरत असून, त्यांना आपल्या मुलींच्या निधनाने धक्का बसला आहे.

नाशिक महापालिका क्षेत्रात पुन्हा एकदा कोरोनाचे रुग्ण वाढत असून, सध्या 244 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. सोबतच गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या डेंग्यू आणि चिकुन गुन्याच्या साथीचे थैमान काही केला कमी व्हायला तयार नाही. जिल्हा सामान्य रुग्णालयामार्फत आज प्राप्त अहवालानुसार जिल्ह्यातील 4 लाख 703 कोरोना बाधितांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

scroll to top
error: आपल्याला माहिती कॉपी करण्याची परवानगी नाही.