मुंबई नाशिक महामार्गावर पहाटे आयशर आणि पिकअपचा अपघात

मुंबई नाशिक महामार्गावर बोरटेंभे ब्रिजजवळ भीषण अपघात झाला. आयशर आणि पिकअप गाडी धडकून तिघे जण जखमी झाले. अपघातात पिकअप कारचा अक्षरशः चक्काचूर झाला.

पिकअप गाडी आयशर वाहनावर धडकल्यामुळे मोठा अपघात झाला. मुंबई नाशिक महामार्गावर बोरटेंभे ब्रिजजवळ हा अपघात झाला. दोन गाड्यांची धडक झाल्यानंतर जोरदार आवाज झाला. अपघातात पिकअप गाडीचा चुराडा झाला.

शुक्रवारी सकाळी 7 वाजताच्या सुमारास हा अपघात झाला. यामध्ये एक जण गंभीर जखमी झाला असून दोघा जणांना किरकोळ दुखापत झाली आहे. जखमींना रुट पेट्रोलिंग टीमने वाहतूक पोलिसांच्या मदतीने बाहेर काढले. जखमींना पुढील उपचारासाठी इगतपुरी येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

दरम्यान, चंद्रपूर जिल्ह्यातील सावली येथील आठवडी बाजारात एक कार घुसल्याची धक्कादायक घटना नुकतीच घडली होती. या घटनेत एकाचा मृत्यू झाला, तर चौघे जण गंभीर जखमी झाले आहेत. 21 ऑक्टोबरला दुपारी 1 वाजताच्या सुमारास ही घटना घडली होती. मार्कंडी शंकर मोहूर्ले (70) रा. खेडी असे मृताचे नाव असून दशरथ कावरु, सोमेश्वर डोमाजी मोहूर्ले कांताबाई कन्नाके, छायाबाई काले हे चार जण जखमी झाले आहेत. गंभीर जखमी झालेल्या अपघातग्रस्तांना गडचिरोली येथील सामान्य रुग्णालयात हलविण्यात आले.

मिळालेल्या माहितीनुसार MH 34 A 0375 ही चारचाकी मारुती कार सिंदोळा मार्गावरून सावलीकडे येत होती. गुरुवार हा सावली येथील आठवडी बाजाराचा दिवस असल्याने रस्त्यावर प्रचंड गर्दी होती. प्रत्यक्षदर्शीच्या सांगण्यावरून कार भरधाव वेगाने असल्याने चालकाचे नियंत्रण सुटले व कारने फळांच्या रिक्षाला धडक दिली. कारने चक्क पाच नागरिकांना चिरडले. पाचही जखमींना सावली येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. या घटनेत खेडी येथील मार्कंडी शंकर मोहूर्ले याचा उपचारांदरम्यान मृत्यू झाला. तर गंभीर जखमींना पुढील उपचाराकरिता गडचिरोली येथील सामान्य रुग्णालयात हलविण्यात आले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

scroll to top
error: आपल्याला माहिती कॉपी करण्याची परवानगी नाही.