चीनच्या नव्या भूमिकेमुळे सीमेवर तणाव वाढत आहे. चीनने सीमेवरील युद्धाला शह निमंत्रण देण्यासारखी कृती सुरु केली आहे. पूर्व लडाखमधील प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर आपल्या भागात 50 हजारांहून अधिक सैनिक तैनात केल्यानंतर चिनी सेना मोठ्या प्रमाणावर ड्रोन (Drone) वापरत आहे. हे ड्रोन भारतीय चौक्यांजवळ उडविण्यात येत आहेत. अधिकृत सूत्रांनी एएनआय या वृत्तसंस्थेला सांगितले की पीपल्स लिबरेशन आर्मीच्या (PLA) ड्रोन (Drone) हालचाली बहुतेक दौलत बेग ओल्डी सेक्टर, गोगरा हाइट्स आदी भागात दिसत आहेत.
भारतीय लष्कर (Indian Army) चीनच्या या कृत्यांवर बारीक नजर ठेवून आहे. भारतीय लष्कर खूप सावध असल्याचे सूत्रांनी सांगितले. ते मोठ्या प्रमाणावर ड्रोन (Drone) तैनात करत आहे. लवकरच ते आपल्या ताफ्यात नवीन इस्रायली आणि भारतीय ड्रोन दाखल करण्यार आहे. सीमेवर चीनच्या आव्हानाचा सामना करण्यासाठी सुरक्षा दलांनी हे ड्रोन घेतले आहेत.
LACवरील सद्य परिस्थितीचा संदर्भ देत सूत्रांनी सांगितले की आता हा संर्षाचा प्रश्न सोडवण्याची गरज आहे. सूत्रांनी सांगितले की चीन अजूनही गप्प बसलेला नाही, तो आपल्या तात्पुरत्या बांधकामांना आपल्या सैनिकांसाठी कायमस्वरूपी तळांमध्ये बदलत आहे. चीनने पूर्व लडाखमधील प्रत्यक्ष नियंत्रण रेषेजवळील भागात तिबेटी गावांजवळ लष्करी छावण्या उभारल्या आहेत.
गलवान (Galwan ) खोऱ्यात झालेल्या हिंसाचारानंतर चिनी सैन्याकडून काँक्रीट इमारतींच्या स्वरूपात बांधली जात आहेत. सूत्रांचे स्पष्ट म्हणणे आहे की, चीनची ही कृती थेट त्याचा हेतू स्पष्ट करत आहे. चीनला आपल्या सैन्याची तैनाती दीर्घकाळ टिकवून ठेवायची आहे. गलवान खोऱ्यातील हिंसक चकमकीनंतरही चीनने गेल्या वर्षीच आपल्या क्षेत्रात काम सुरू केले. सूत्रांचे म्हणणे आहे की हिवाळ्याच्या गरजा पूर्ण करण्यासाठी, चिनी बाजूने अनेक ठिकाणी अजूनही बांधकाम सुरू आहे.
आश्चर्याची गोष्ट म्हणजे चीनने तणावाच्या काही भागांतून आपले सैन्य मागे घेतले असले तरी एप्रिल 2020 पासून सीमेवर तैनात असलेल्या कोणत्याही सैन्यदलाला त्याने पूर्णपणे माघारी घेतलेले नाही. सध्या चिनी लष्कर भारतीय सीमेजवळ आपले सैन्य दीर्घकालीन तैनात करण्याच्या अजेंड्यावर काम करत आहे. चीनचा हेतू किती धोकादायक आहे, याचा अंदाज चीनच्या सैन्याने भारतीय सीमेजवळील तिबेटच्या गावांमध्ये लष्करी तळांच्या उभारणीत मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक करत आहे यावरून दिसून येत आहे.