केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने जारी केलेल्या माहितीनुसार, आता कार उत्पादक कंपन्या, ऑटोमोबाइल असोसिएशन आणि NGO ला देखील ड्रायव्हिंग लायसन्ससाठी प्रशिक्षण केंद्र सुरू करण्यास परवानगी देण्यात आली आहे. आता या संस्था ड्रायव्हिंग टेस्टमध्ये उत्तीर्ण उमेदवारांना ड्रायव्हिंग लायसन्स देऊ शकणार आहेत.
कोरोना काळानंतर, देशातल्या जवळपास सर्व राज्यांच्या परिवहन विभागाने लर्निंग लायसन्ससाठी फी जमा करण्याकरता असणाऱ्या पद्धतीत बदल केला आहे. नव्या पद्धतीनुसार, आता स्लॉट बुकिंग झाल्यावर लगेच लर्निंग लायसन्ससाठी पैसे जमा करावे लागतात. पैसे जमा केल्यानंतर तुमच्या सोयीनुसार तुम्हाला चाचणी परीक्षेकरता तारीख दिली जाते.
लायसन्सशी संबंधित सेवांसाठी तुम्हाला परिवहन विभागाच्या वेबसाइटवर जाऊन गरजेनुसार ड्रायव्हिंग लायसन्स सेवेच्या ऑप्शन्सवर क्लिक करावं लागेल. फॉर्म भरताना तुम्हाला तुमचा ड्रायव्हिंग लायसन्स क्रमांक आणि वैयक्तिक माहिती द्यावी लागेल. तसंच या वेळी ड्रायव्हिंग लायसन्ससाठी आवश्यक कागदपत्रं अपलोड करावी लागतील. आरटीओ कार्यालयात बायोमेट्रिक तपशील तपासल्यानंतर तुमच्या सर्व कागदपत्रांची पडताळणी केली जाईल. यानंतर तुमच्या ड्रायव्हिंग लायसन्स रिन्यूव केलं जाईल.