गरीबांना मोफत रेशन योजना आता बंद होणार

देशाच्या अर्थव्यवस्थेवर पडणारा ताण कमी करण्यासाठी केंद्र सरकाने मोठा निर्णय घेतला आहे. कोरोना संसर्ग आणि लॉकडाऊनदरम्यान गरीबांना दिलासा देणारी योजना थांबवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. पंतप्रधान गरीब कल्याण योजनेअंतर्गत गरीबांना मोफत रेशन योजना आता बंद होणार आहे.

केंद्र सरकारने एका निर्णयात म्हटले की, अर्थव्यवस्था हळु हळु सुधारत आहे. यासाठी PMGKAY अंतर्गत गरीबांना मोफत देण्यात येणारे रेशनचे वितरण फक्त 30 नोव्हेंबरपर्यंत देण्यात येईल. नागरी पुरवठा मंत्रालयाचे सचिव सुधांशू पांडेयने ही माहिती दिली आहे.

मीडिया रिपोर्टनुसार, उत्तर प्रदेशसह अनेक राज्यांमध्ये विधानसभा निवडणुका होणार आहेत. या निवडणुका मार्चपर्यंत पूर्ण होतील. लोकांना आशा होती की, मार्च महिन्यापर्यंत PMGKAY योजना सुरू राहू शकते. परंतु तिजोरीवर वाढता ताण लक्षात घेता. सरकारने हा निर्णय घेतला आहे.

नुकतेच केंद्र सरकारने पेट्रोल डिझेलवरील एक्साइज ड्युटी कमीकरून लोकांना दिलासा दिला होता. परंतु मोफत रेशनची योजना बंद झाल्याने गरीबांची चिंता वाढली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

scroll to top
error: आपल्याला माहिती कॉपी करण्याची परवानगी नाही.