प्रायव्हेट फोटो लॉक करणारे फीचर आणणार गुगल

जर तुम्ही गुगलवर फोटो आणि व्हिडिओ लॉक करु इच्छित असाल तर गुगल तुमच्यासाठी खास फीचर लॉंच करणार आहे. गुगल आपले प्रोडक्टर गुगल फोटोजमध्ये विशेष फीचर ऍड करणार आहे. कंपनीने म्हटले आहे की, युजर्ससाठी लॉक फोल्डर फीचर रोलआऊट करण्यात येणार आहे. याच्या मदतीने ऍन्ड्राइड युजर्स आपले फोटो आणि व्हिडिओला लॉक करू शकतात.

या फीचरच्या मदतीने युजर्स ज्या फोटो आणि व्हिडिओला हाइड करतील ते ऍपच्या मेन ग्रिड आणि सर्चमध्ये दिसणार नाही. कंपनीने आता या फीचरच्या लॉंचिंग डेटचा खुलासा केलेला नाही. परंतु गुगलने ट्विट करून फीचर्सच्या बाबतीत माहिती दिली आहे. वापरकर्ते गुगल फोटोजमध्ये आपले फोटो आणि व्हिडिओ हाइड करू शकतात.

गुगलने ट्वीट करून माहिती दिली होती की, आधी फिचर गुगल पिक्सलवर लॉंच होईल त्यानंतर वर्षभरात सर्व ऍन्ड्राइड स्मार्ट फोनवर लॉंच होईल. यामुळे तुमचे प्रायव्हेट फोटो आणि व्हिडिओ तुम्हाला सहजरित्या लॉक ठेवता येतील.

या फीचरचा वापर करण्यासाठी वापरकर्त्यांना सर्वात आधी गुगल फोटोजच्या लायब्ररीमध्ये जावं लागेल.
लायब्ररीत गेल्यानंतर Utilities च्या ऑप्शनवर टॅप करा. यावर क्लिक केल्यानंतर Lock Folder च्या ऑप्शनवर नजर जाईल. त्यानंतर फोटो किंवा व्हिडिओ लॉक करता येईल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

scroll to top
error: आपल्याला माहिती कॉपी करण्याची परवानगी नाही.