पाकिस्तानच्या पराभवामुळे भारताला फायदा, WTCच्या फायनलमध्ये पोहोचण्याची संधी

भारत आणि पाकिस्तान हे कट्टर प्रतिस्पर्धी आहेत. आय़सीसीच्या स्पर्धेत दोन्ही संघात सामना बघायला मिळतो. आयसीसी टेस्ट चॅम्पियनशिपमध्ये एका संघाच्या विजयाचा आणि पराभवाचा इतर संघांच्या स्पर्धेतील वाटचालीवर परिणाम दिसून येतो. आता पाकिस्तानचा इंग्लंडविरुद्ध पहिल्या कसोटीत पराभव झाल्यानंतर भारतीय संघाला याचा फायदा झाला आहे.

पाकिस्तानच्या संघाला इंग्लंडविरुद्ध रावळपिंडी कसोटीत पराभवाचा धक्का बसला. सध्या पाकिस्तानचा संघ कसोटी चॅम्पियनशिप स्पर्धेच्या टेबलमध्ये पाचव्या स्थानी आहे. यामुळे  त्यांच्या पुढील वाटचालीत अडथळा निर्माण होण्याची शक्यता आहे. ऑस्ट्रेलिया सध्या भक्कम स्थितीत असून ते टॉपला आहेत. तर दुसऱ्या स्थानावर दक्षिण आफ्रिका आणि तिसऱ्या स्थानी श्रीलंका आहे. भारत टेस्ट चॅम्पियनशिपच्या टेबलमध्ये चौथ्या स्थानी आहे.

पाकिस्तानला रावळपिंडी कसोटीत पराभव पत्करावा लागल्याने भारतीय संघाला टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनलमध्ये जाण्याची संधी वाढली आहे. भारतीय संघाचे एकूण सहा सामने शिल्लक आहेत. यातील २ बांगलादेशविरुद्ध तर एक ऑस्ट्रेलियाविरुद्ध असणार आहे. भारत बांगलादेशविरुद्ध दोन्ही कसोटी जिंकला आणि ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेत २-१ किंवा ३-१ ने मालिका विजय साजरा केला तरी फायनलमध्ये स्थान पटकावू शकतो. तर ऑस्ट्रेलियाचा संघ जर वेस्ट इंडिजमध्ये क्लीन स्वीप करण्यात यशस्वी झाला आणि दक्षिण आफ्रिका दोन्ही सामने जिंकल्यास ते फायलनमध्ये पोहोचू शकतात.

पाकिस्तानला आता त्यांचे उर्वरित चार सामने घरच्याच मैदानावर खेळायचे आहेत. इंग्लंडसोबत त्यांचे दोन सामने बाकी आहेत. त्यानंतर न्यूझीलंडविरुद्ध दोन कसोटी सामन्यांची मालिका खेळायची आहे. पाकिस्तानला वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनलमध्ये पोहोचायचे असेल तर त्यांना घरच्या मैदानावर कमाल करावी लागेल. तसंच रावळपिंडी कसोटीतील फ्लॅट खेळपट्टी पाहता त्यांचे सामने अनिर्णित राहण्याची शक्यता जास्त आहे. यामुळे पाकिस्तानच्या अडचणीत वाढच होऊ शकते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

scroll to top
error: आपल्याला माहिती कॉपी करण्याची परवानगी नाही.