मुंबई, ठाणे, रायगड जिल्ह्यात कोल्हापूर जिल्हा दूध संघाकडून (गोकुळ) दुधाच्या दरात वाढ करण्यात आली आहे. महागाईमुळे सर्वसामान्यांचे कबंरडे मोडले असताना आता नवीन दूध दर वाढीचा पुन्हा सामान्यांना भुर्दंड बसणार आहे. गोकुळ दूध संघाने गाईच्या दूध दरात मागच्या तीन महिन्यात दुसऱ्यांदा पुन्हा एकदा वाढ केली आहे. गायीच्या दूधामध्ये लिटरमागे गोकुळने 3 रुपयांची वाढ केली आहे तर आरदा लिटरमागे 2 रुपयांची वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे गोकुळच्या गाईच्या दूध दरात प्रतिलिटर 54 रुपये झाला आहे.
गोकुळकडून ही दुधाची दरवाढ मुंबई, ठाणे, रायगड जिल्ह्यात करण्यात आली आहे. याबाबत त्यांनी तशी माध्यमात जाहिरात दिली आहे. आजपासून नवे दर लागू होणार असल्याची माहिती गोकुळचे चेअरमन विश्वास पाटील यांनी दिली.
असे असतील दर
गोकुळच्या सर्व ग्राहकांना कळविण्यात येते की, दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या दूध खरेदी दरामध्ये वाढ करण्यात आल्यामुळे संघामार्फत दिनांक 06-12- 2022 पासून (दिनांक 05- 12 -2022 च्या मध्यरात्रीपासून) मुंबई शहर व उपनगरे, नवी मुंबई, ठाणे व रायगड जिल्हयामध्ये वितरीत होणाऱ्या गोकुळ दुधाच्या ग्राहक किंमतीत नाईलाजास्तव वाढ करण्यात येत असून, सदरचे सुधारीत दर खालीलप्रमाणे राहतील. याची ग्राहकांनी नोंद घ्यावी व सहकार्य करावे.
गाय दूध (1 लिटर.) जुना दर 51, नवीन दर 54, गाय दूध (500 मिली.) 27 रुपये, गोकुळ ब्रँडच्या फुल क्रिम दुधाच्या ग्राहक दरात बदल नाही.