बिग बाॕस मराठीचा चौथा सीझन संपत आला आहे. नव्या वर्षात 8 जानेवारीला सीझनचा ग्रँड फिनाले आहे. ग्रँन्ड फिनले होताच तेजस्विनी लोणारी च्या चाहत्यांसाठी मात्र आनंदाची बातमी समोर आली आहे. पब्लिक विनर सर्वांची लाडकी तेजस्विनीच्या हाताला दुखापत झाल्यानं घराबाहेर आली. तिचं अचानक घराबाहेर पडणं कोणाला पटलं नाही. पण शारिरीक कारणामुळे तिला नाईलाजानं घराबाहेर पडावं लागलं. तिच्या उजव्या हाताला दुखापत झाली होती. हाताला फ्रँक्चर करण्यात आलं होतं. तिला उजव्या हाताची हालचार करण्यास मनाई करण्यात आली होती. पण आता तेजस्विनीची सगळी चिंता मिटली आहे. कारण तेजस्विनीच्या हाताचं फ्रँक्चर पूर्णपणे काढून टाकण्यात आलं आहे. तेजस्विनीनं स्वत: ही खुशखबर तिच्या चाहत्यांना दिली आहे.
बिग बॉसच्या घरात टास्क दरम्यान झटापटीत तेजस्विनीच्या उजव्या हाताला दुखापत झाली. तेजस्विनीच्या उजव्या हाताच्या चौथ्या बोटाला बेटाकार्पलजवळ क्रॅक गेला होता. त्यामुळे डॉक्टरांनी तिला हालचाल करण्यास मनाई केली. हाताची जास्त हालचाल होऊ नये यासाठी प्लास्टर करण्यात आलं आहे. बिग बॉसच्या घरातील डॉक्टरांनी तिला सहा आठवडे फ्रँक्चर ठेवण्यासाठी सांगितलं होतं. मात्र वैयक्तिक डॉक्टरांनी 4 आठवड्यात हात बरा होईल असं सांगितलं होतं.
हात बरा होताच तेजस्विनीनं चाहत्यांचे आभार मानत पोस्ट शेअर केली आहे. सोबत हाताचा फ्रँक्चर नसलेला फोटो शेअर केलाय. तिनं पोस्टमध्ये म्हटलंय, ‘जेव्हा सगळंच संपलय असं आपल्याला वाटून जातं तेव्हा तिच खरी वेळ असते नवं काहीतरी सुरु होण्याची. गुरुवारी हात फॅक्चर झाला होता आणि आज गुरुवारीच तो बरा देखील झाला आहे. आयुष्यातील खडतर प्रवासात तुम्हा लोकांची ज्या पद्धतीने मला साथ लाभली आहे ते पाहता माझ्यासारखा भाग्यवान दुसरा कोणी नसेल! तुमचे मनापासून आभार’.