प्रत्येक भारतीयाला युनिक हेल्थ आयडी देण्यात येणार

केंद्रामधील पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकार मोठी घोषणा करण्याच्या तयारीत आहे. पुढील आठवड्यात एक मोठी योजना सुरू करणार आहेत. यामध्ये प्रत्येक भारतीयाला एक युनिक हेल्थ आयडी (Unique Digital Health ID ) देण्यात येणार आहे. पंतप्रधान मोदी 27 सप्टेंबरला पंतप्रधान डिजिटल आरोग्य मिशन सुरू करणार आहेत.

प्रत्येक भारतीयाला आता एक युनिक हेल्थ आयडी देण्यात येणार आहे, अशी माहिती केंद्रीय आरोग्यमंत्री मनसुख मांडविया (Mansukh Mandaviya) यांनी दिली. युनिक हेल्थ आयडीमध्ये त्या व्यक्तीचे संपूर्ण आरोग्यबाबतचे रेकॉर्ड असेल, असे ते म्हणाले.

मोदी यांनी 23 सप्टेंबर 2018 मध्ये आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जनआरोग्य योजना (AB PM-JAY) सुरू केली होती. या योजनेचा काल तिसरा वर्धापनदिन होता. 23 सप्टेंबर हा दिवस दरवर्षी आयुष्मान भारत दिवस (Ayushman Bharat Divas) म्हणून साजरा केला जाणार आहे. त्या निमित्ताने यावर्षी 23 सप्टेंबर ते 25 सप्टेंबर ‘आरोग्य मंथन 3.0’ या ऑनलाईन आणि ऑफलाईन स्वरूपाच्या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आले आहे. त्यावेळी ही माहिती मांडविया यांनी दिली.

तीन दिवस चालणाऱ्या या कार्यक्रमाचा समारोप 27 सप्टेंबर 2021 ला पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते ‘प्रधानमंत्री डिजिटल हेल्थ मिशन’ चं (PM-DHM) लोकार्पण करून होईल. देशातील विविध राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांतील आयुष्मान भारत योजनेच्या लाभार्थींशी (Beneficiary) मांडवीय यावेळी संवाद साधणार आहेत. मांडवीय यांच्या हस्ते एनएचएच्या वार्षिक अहवालाचे प्रकाशनही केलं जाणार आहे. देशातील सर्व राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांत (States and Union Territories) सरकारची आयुष्मान भारत ही योजना जनतेपर्यंत पोहोचवण्यात मोलाचं योगदान देणाऱ्या व्यक्तींना यावेळी मांडवीय यांच्या हस्ते पुरस्कार देऊन गौरवरण्यात येणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

scroll to top
error: आपल्याला माहिती कॉपी करण्याची परवानगी नाही.