महागाई आणि सणासुदीच्या काळात आणखी एक धक्का मिळाला आहे. महागाईचा फटका सहन करणाऱ्या सर्वसामान्यांना आणखी एक झटका बसू शकतो. नैसर्गिक गॅसच्या किमतीत विक्रमी वाढ झाल्यानंतर सीएनजी 8 ते 12 रुपये प्रति किलोने महाग होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. तर एलपीजीच्या दरात प्रति युनिट 6 रुपयांनी वाढ होऊ शकते असा अंदाज विश्लेषकांनी व्यक्त केला आहे.
मुंबईत सीएनजी आणि पीएनजीच्या दरात पुन्हा एकदा वाढ झाली आहे. ऐन सणासुदीच्या काळात मुंबईकरांच्या खिशाला चांगलीच कात्री लागणार आहे. मुंबईत सीएनजी 6 तर पीएनजी 4 रूपयांनी महागला आहे.
दसऱ्याच्या एक दिवस आधी महानगर गॅस लिमिटेडनं सीएनजी आणि पीएनजीच्या दरात वाढ केली आहे. मुंबईत आता सीएनजी 86 रूपये प्रति किलो तर पीएनजीचा दर 52 रूपये 50 पैसे इतका असणार आहे. कोटक इंस्टिट्यूशनल इक्विटीजच्या म्हणण्यानुसार एपीएस गॅसच्या किंमती एका वर्षात ५ पट वाढल्या आहेत.
पुण्यात CNG सोमवारपासून 4 रुपयांनी महाग केला आहे. आज काही ठिकाणी 5 ते 6 रुपयांनी वाढवला आहे. आणखी दर वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. खते तयार करण्यासाठी तसेच वीज निर्मितीसाठी नैसर्गिक गॅस हा प्रमुख कच्चा माल आहे. त्याचे सीएनजीमध्ये रूपांतर होते आणि स्वयंपाकघरात पाईप्सद्वारे स्वयंपाक करण्यासाठी देखील वापरला जातो.