अखेर सस्पेन्स संपला! अमित शाह आणि फडणवीसांना मी भेटणारच; खडसेंचं स्पष्ट विधान
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या भेटीबाबत मागील काही दिवसांपासून जोरदार चर्चा सुरू आहे. अमित शाहांनी एकनाथ खडसेंना भेट नाकारली, त्यांना तीन तास कार्यालयाबाहेर प्रतीक्षा करायला लावली किंवा एकनाथ खडसे भाजपात पक्षप्रवेश करणार आहेत, अशा विविध चर्चा सध्या राजकीय वर्तुळात सुरू आहेत.या सर्व चर्चेदरम्यान, एकनाथ खडसे यांनी स्वत:च स्पष्टीकरण दिलं आहे. मी अमित शाहा आणि देवेंद्र फडवणीस यांना भेटणारच आहे. मी कोणत्याही राजकीय कारणांसाठी त्यांना भेटत नाहीये. अन्य विषयासंदर्भात मला त्यांची भेट हवी आहे, असंही खडसे यावेळी म्हणाले. ते जळगावात प्रसारमाध्यमांशी संवाद साधत होते.
रिलायन्स Jio लाँच करणार स्वस्त लॅपटॉप, किंमत फक्त 15 हजार
रिलायन्स जिओनं टेलिकॉम क्षेत्रात दमदार एन्ट्री केल्यानंतर अल्पावधीतच या क्षेत्रात दमदार पकड मिळवली आहे. अलीकडच्या काळात जिओनं स्वस्त स्मार्टफोन लाँच केले आहेत. आता रिलायन्स जिओनं लॅपटॉप मार्केटमध्येही दस्तक देण्याची तयारी केली आहे. एका रिपोर्टमध्ये असं सांगण्यात आलं आहे की कंपनी लवकरच भारतात आपला स्वस्त लॅपटॉप लॉन्च करणार आहे. त्याची किंमत 15 हजार रुपयांपेक्षा कमी ठेवली जाईल. यापूर्वी कंपनीनं स्वस्त फोनही बाजारात आणले आहेत.
एका वर्षांत 5 वेळा महाग झाला घरगुती गॅस सिलिंडर
महागाईचा फटका सर्वसामान्य नागरिकांना जास्त बसला आहे. एक वर्षात घरगुती सिलिंडर गॅसचे दर 5 वेळा वाढले आहेत. तर 19 किलो सिलिंडर जो कर्मशिअलसाठी वापरला जातो, त्याचे दर एक वर्षात 11 वेळा घटले आहेत. तर केवळ 6 वेळा महाग झाले आहेत.एका वर्षात घरगुती सिलिंडर दिल्लीमध्ये 153.5 रुपयांनी महाग झाला आहे. 6 जुलै रोजी घरगुती सिलिंडर गॅसचे भाव बदलले होते. तेव्हा देखील 50 रुपये जास्त खिशाला कात्री लागली होती. त्यानंतर गृहिणींना दिलासा मिळालाच नाही. घरगुती गॅस सिलिंडरचे दर वाढतच जात आहे. कर्मशियल सिलिंडर 25.5 रुपयांनी स्वस्त झाला आहे.
पुण्यात आता आंदोलनही ‘चुलीवरचं’, राष्ट्रवादीच्या महिलांनी रस्त्यावर बनवला फराळ
मागच्या काही वर्षांमध्ये पुण्यात चुलीवरच्या पदार्थांची क्रेझ मोठ्याप्रमाणावर वाढली आहे. चुलीवरची मिसळ, चुलीवरचं मटण आणि चुलीवरच्या पिझ्झा यानंतर आता पुण्यात चुलीवरचा फराळ बनवण्यात आला आहे. चुलीवरचा हा फराळ वाढती मागणी अथवा मार्केटिंगमुळे नाही तर आंदोलनासाठी बनवण्यात आला. केंद्र सरकारच्या 15 एलपीजी सिलेंडर देण्याच्या निर्णयाविरोधात राष्ट्रवादी काँग्रेसने पुण्याच्या टिळक रोडवरच्या अभिनव चौकात आंदोलन करण्यात आलं.1053 रुपये देऊनही वर्षाला 15 सिलेंडरच का? हेच आहेत का अच्छे दिन? अशी पोस्टर घेऊन राष्ट्रवादीचे कार्यकर्ते रस्त्यावर उतरले होते. राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिलांनी चुलीवर करंजी आणि चकली हे पदार्थ बनवले.
मर्सिडीजनंतर आता BMW कार, महामार्गावर काही क्षणात झाला कोळसा
टाटा सन्सचे माजी चेअरमन सायरस मिस्त्री यांचा मर्सिडीज कारमध्ये असताना अपघातात मृत्यू झाल्यामुळे कारच्या सुरक्षेबाबत अनेक प्रश्न निर्माण झाले आहे. अशातच नाशिकमध्ये BMW कारचा एक व्हिडीओ समोर आला आहे. महामार्गावरच BMW कारने पेट घेतला. या अपघातात 2 जण थोडक्यात बचावले आहे.मिळालेल्या माहितीनुसार, नाशिक-पुणे महामार्गावर रविवारी रात्री ही घटना घडली. पुणे मार्गावर उपनगर सिग्नलजवळ ही घटना घडली. सिग्नलवर आलेल्या या BMW कारने अचानक पेट घेतला. अचानक पेट घेतल्यामुळे कारमधील कुटुंबीयांनी बाहेर धाव घेतली. बाहेर पडल्यानंतर अवघ्या काही सेकंदामध्ये कारचा भडका उडाला. बघता बघता कार आगीच्या भक्षस्थानी सापडली.
जय मल्हार ते आदिपुरूष! मराठमोळ्या अभिनेत्याची मोठी झेप
साऊथ सुपरस्टार प्रभासच्या नव्या ‘आदिपुरूष’ सिनेमाचा ट्रेलर नुकताच रिलीज झाला आहे. रामायणावर आधारीत सिनेमानं गेल्या अनेक दिवसांपासून प्रेक्षकांची उत्सुकता वाढवली होती. ट्रेलर पाहून सिनेमा कसा असेल याचा अंदाज प्रेक्षकांना आला आहे. अभिनेता प्रभास श्री रामांच्या भूमिकेत आहे. तर अभिनेता सैफ अली खाननं रावण साकारला आहे. अभिनेत्री क्रीती सेनन सीतेच्या भूमिकेत आहे. या सगळ्यात प्रेक्षकांना खास सप्राइज मिळालं आहे. ते म्हणजे सिनेमात अनेक मराठी कलाकार आहेत. त्यातील एक चेहरा समोर आला आहे तो म्हणजे अभिनेता ‘देवदत्त नागे’.
जय मल्हार मालिकेतून महाराष्ट्राच्या घराघरात पोहोचलेला देवदत्त नागेनं हिंदी सिनेमात काम करायला सुरू केल्यानंतर त्यानं मोठी भरारी घेतली आहे. मराठी टेलिव्हिजनवर तो प्रसिद्ध होताच मात्र प्रभासबरोबर आदिपुरूषमध्ये राम भक्त आदिपुरुषच्या भूमिकेत देवदत्त प्रेक्षकांसमोर येणार आहे. सिनेमाच्या ट्रेलरमध्ये हनुमानाच्या वेशातील देवदत्तचा पहिली लुक समोर आला आहे. त्याचप्रमाणे सिनेमात अभिनेत्री तेजस्विनी प्रधान देखील असल्याचं म्हटलं जात आहे पण तिचा लुक अजून समोर आलेला नाही.
श्रीवल्ली फेम गायक सिड श्रीरामचं मराठीत पदार्पण! ‘वाह रे शिवा’ म्हणत जिंकली प्रेक्षकांची मनं
छत्रपती शिवाजी महाराजांच्या आयुष्यात आधारीत अनेक सिनेमे प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. त्यातील एका सिनेमाची चर्चा सुरू आहे तो सिनेमा ‘हर हर महादेव’. अभिनेता सुबोध भावे शिवाजी महाराजांच्या मुख्य भूमिकेत असलेल्या सिनेमात अभिनेता शरद केळकर बाजूप्रभू देशपांडेंची तगडी भूमिका साकारताना दिसणार आहे. हर हर महादेव सिनेमातील ‘वाह रे शिवा’ हे पहिलं गाणं नुकतंच रिलीज झालं आहे आणि हे गाणं सिनेमाप्रती उत्सुकता आणखी वाढवत आहे. इतके दिवस श्रीवल्ली गाण्यातून प्रेक्षकांच्या मनावर राज्य करणारा गायक सीड श्रीरामनं हे गाणं गायलं आहे. गाण्याला प्रेक्षकांची पसंती मिळत आहे.
पूल पाडला मात्र…चांदणी चौकातील वाहतूक कधी येणार रुळावर?
पुण्यातील चांदणी चौकातील पूल पाडण्यासाठी प्रशासनाकडून मोठे प्रयत्न केले जात होते. रात्री उशिरा 2.33 वाजेच्या सुमारास चांदणी चौकातून पूल स्फोटकांनी पाडण्यात आला. नियंत्रिक स्फोटाद्वारे हा पूल अवघ्या 5 सेकंदात स्फोटकांनी पाडण्यात आला होता. यादरम्यान रात्री 11 वाजल्यापासून या परिसरात नागरिकांना प्रवास करण्यास बंदी आणली होती.
दरम्यान आजही चांदणी चौक परिसरातील खडक फोडण्यासाठी ब्लास्ट करण्यात आला होता. ब्लास्टनंतर खडक महामार्गावर आल्याने मुंबई बंगळुरू हायवेवरील वाहतूक ठप्प झाली होती.
अधिकाऱ्यांना इशारा देत अजितदादांचं ‘पुन्हा येईन’, फडणवीसांनी सांगितली वक्तव्याची Inside Story
साताऱ्यातल्या एका कार्यक्रमात बोलताना विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी विरोधकांसह अधिकाऱ्यांना इशारा दिला आहे. सत्तेचा माज करू नका, जाणीवपूर्वक त्रास देणं बंद करा, आम्ही कधी सत्तेत आलो हे कळणारसुद्धा नाही, असं सूचक विधान अजित पवार यांनी केलं आहे. साताऱ्याच्या मार्डीत भव्य शेतकरी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होतं, यावेळी बोलताना अजित पवारांनी अधिकाऱ्यांना थेट खडे बोल सुनावले, आमच्याकडे सर्व संस्था होत्या, पण कधी आम्ही सत्तेचा माज केला नाही, असंही अजित पवार म्हणाले.
अजित पवारांच्या या वक्तव्यावर आता भाजपकडून प्रतिक्रिया यायला सुरूवात झाली आहे. अजित पवारांनी असं वक्तव्य का केलं, याच कारणही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं आहे. कार्यकर्त्यांना दिलासा देण्यासाठी अजितदादा आपली सत्ता येईल, असं कार्यकर्त्यांना सांगत आहेत, असा पलटवार देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची सही केली अन् तब्बल 1 कोटी खिशात; तरुणांनी वापरली नवी क्लुप्ती
काही दिवसांपूर्वी अदार पूनावाला यांच्या सिरम इन्स्टिट्यूटची तब्बल एक कोटी रुपयांची फसवणूक करण्यात आली होती. ही घटना ताजी असतानाच आता आणखी एक घटना समोर आली आहे. मात्र, यावेळी थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची बनावट स्वाक्षरी करुन एक कोटींहून अधिक रुपयांच्या आर्थिक फसवणुकीचा प्रकार उघड झाला आहे. मुख्यमंत्र्यांची सही असलेल्या सरकारी व्यवहारांच्या पेमेंट स्लिप दाखवून फ्रँचायझी उघडण्याचे आमिष दाखवून पालघरमध्ये एका व्यक्तीची 1.31 कोटी रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी दोन जणांविरुद्ध एफआयआर दाखल करण्यात आला आहे.
वर्ल्ड कपआधी किंग कोहलीला आराम
रोहित शर्माच्या टीम इंडियानं दक्षिण आफ्रिकेविरुद्धची मालिका 2-0 अशा फरकानं खिशात घातली आहे. त्यामुळे या मालिकेतला उद्या होणारा अखेरचा सामना औपचारिक स्वरुपाचा असेल. इंदूरच्या होळकर स्टेडियमवर हा सामना खेळवला जाणार आहे. त्यानंतर भारतीय संघ लगेचच ऑस्ट्रेलियाला रवाना होईल. दरम्यान अखेरच्या टी20त भारतीय संघात नक्कीच मोठे बदल केले जाण्याची शक्यता आहे. मिळालेल्या माहितीनुसार टीम इंडियाचा माजी कर्णधार आणि धडाकेबाज फलंदाज विराट कोहलीला वर्ल्ड कपआधीच्या या शेवटच्या सामन्यातून विश्रांती दिली जाणार आहे. त्यामुळे त्याच्या जागी श्रेयस अय्यरला भारतीय संघात संधी मिळू शकते.
SD Social Media
9850 60 3590