कोविड-19 प्रतिबंध लसीकरण मोहिमेतंर्गत, बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या वतीने शुक्रवारी म्हणजेच काल (17 सप्टेंबर 2021) मुंबईतील सर्व शासकीय आणि महानगरपालिका कोविड-19 लसीकरण केंद्रांवर फक्त महिलांसाठी राखीव असे विशेष लसीकरण सत्र राबवण्यात आलं. त्यानुसार या सत्रात एकूण 1 लाख 27 हजार 351 महिलांना शुक्रवारी लस देण्यात आली. यात महिलांना थेट येऊन कोविड लसीची पहिली किंवा दुसरी मात्रा घेण्याची मुभा देण्यात आली होती.
काल झालेल्या महिला लसीकरण विशेष सत्रात एकूण 1 लाख 27 हजार 351 लसी दिल्या गेल्या. ज्यात मुंबईत महानगरपालिका, शासकीय आणि खासगी लसीकरण केंद्रांचा समावेश होता. तर त्यापैकी महापालिका आणि शासकीय लसीकरण केंद्रावर एकूण 1 लाख 07 हजार 934 लसी देण्यात आल्या.