‘बिग बॉस OTT’ चा आज महाअंतिम सोहळा रंगणार आहे. गेली ६ आठवडे सुरु असणारा हा प्रवास आज अखेर थांबणार आहे. त्याचबरोबर बिग बॉस OTT च्या पहिल्या भागात चाहत्यांनी कोणाला आपली पसंती दर्शवली आहे, हे काही तासांमध्ये आपल्या समोर येणार आहे. आज संध्याकाळी ७ वाजता हा अंतिम सोहळा सुरु होणार आहे. बिग बॉसचा हा पहिला सीजन होता जो दर्शकांना २४ तास बघता येत होता. मात्र आज अंतिम सोहळ्याच्या २४ तास आधी हे ऑनलाइन स्ट्रीमिंग बंद करण्यात आलं आहे.
इतकंच नव्हे तर या महाअंतिम सोहळ्याद्वारे सलमान खानच्या टीव्हीवरील ‘बिग बॉस १५’ चं चित्र आज स्पष्ट होणार आहे. चाहत्यांना बिग बॉसच्या १५ व्या सीजनची मोठी उत्सुकता लागली आहे. तसेच आजच्या महाअंतिम सोहळ्यामध्ये एकूण पाच स्पर्धकांनी आपलं स्थान पक्क केलं आहे. यामध्ये राकेश बापट, शमिता शेट्टी, प्रतीक सहेजपाल,दिव्या अग्रवाल आणि निशांत भट्ट या स्पर्धकांचा समावेश आहे. अनेक चढउतारांना पार करत या पाच स्पर्धकांनी अंतिम सोहळ्यापर्यंत मजल मारली आहे. त्यामुळे त्यांच्यावर चाहत्यांकडून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.
कधी आणि कसं पाहाल बिग बॉस OTT FINALE-
तुमच्यासुद्धा मनात हा प्रश्न असेल, कि आम्ही बिग बॉस OTT चा महाअंतिम सोहळा कधी, कुठे आणि किती वाजता पाहणार? तर तुमच्या या प्रश्नाचा उत्तर आमच्याकडे आहे. बिग बॉस वटत OTT चा महाअंतिम सोहळा तुम्ही सर्व लोक शनिवारी अर्थातच १८ सप्टेंबर रोजी संध्याकाळी ७ पासून पाहू शकता. हा अंतिम सोहळा VOOT सिलेक्त ऍपवर पाहता येणार आहे. मात्र यासाठी voot चं सब्स्क्रिप्शन असणं गरजेचं आहे. जर वूटचं सबस्क्रिप्शन नसेल तर हा सोहळा आपल्याला उद्या म्हणजेच एक दिवस नंतर १९ सप्टेंबरला पाहता येणार आहे.
‘बिग बॉस OTT’ आणि बिग बॉस सीजन १५ चा खूपच स्ट्रॉन्ग कनेक्शन आहे. कारण बिग बॉस ott चा विजेता थेट सलमान खानच्या बिग बॉस सीजन १५ चा एक बनणार आहे. अर्थातच तो विजेता या १५ व्या सीजनमध्ये झळकणार आहे. त्यामुळे सर्वांनाच विजेता जाणून घेण्याची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. तसेच करण जोहर होस्ट करत असलेल्या या बिग बॉस ott च्या महाअंतिम सोहळ्यामध्ये अभिनेता रितेश देशमुख आणि पत्नी जेनेलिया देशमुख पाहुणे म्हणून उपस्थित असणार आहेत. तसेच हे दोघे बिग बॉस १५ मध्ये कोण सहभागी होणार याची घोषणासुद्धा करणार आहेत.
तसेच या अंतिमसोहळ्याच्या अवघ्या ३ दिवस आधी गायिका आणि स्पर्धक नेहा भसीन शोमधून बाहेर झाली होती. ती प्रतीकची जोडीदार होती. या दोघांमध्ये खूपच जवळीक निर्माण झाली होती. तसेच नेहाच्या जाण्याने प्रतीक भावुक झाला होता. त्याचबरोबर ६ दिवसांपूर्वी मूस जट्टान या शोमधून बाहेर झाली होती.