LPG सिलेंडर पुन्हा भडकले,15 दिवसात 50 रुपयांची वाढ

घरगुती एलपीजी सिलिंडरच्या LPG Cylinder किंमतीत पुन्हा एकदा वाढ करण्यात आली आहे.

गेल्या 15 दिवसांत विनाअनुदानित एलपीजी सिलेंडर 50 रुपयांनी महागला आहे. आज म्हणजेच 1 सप्टेंबर रोजी सिलिंडर पुन्हा एकदा 25 रुपयांनी महागला आहे. यापूर्वी 18 ऑगस्ट रोजी पेट्रोलियम कंपन्यांनी गॅस सिलिंडरच्या किंमतीत 25 रुपयांनी वाढ केली होती. आता 14.2 किलो विनाअनुदानित एलपीजी सिलेंडरची किंमत दिल्लीत 25 रुपयांनी वाढली आहे. या वाढीनंतर आता दिल्लीत 14.2 किलो एलपीजी सिलेंडरची किंमत वाढून 884.50 रुपये इतकी झाली आहे.

जुलै आणि ऑगस्टमध्ये किंमती वाढवण्यात आल्या होत्या. मे आणि जूनमध्ये घरगुती सिलिंडरच्या किंमतीत कोणताही बदल झाला नाही. तर एप्रिलमध्ये एलपीजी सिलिंडरच्या किंमतीत 10 रुपयांची कपात करण्यात आली होती. दिल्लीत एलपीजी सिलिंडरची किंमत या वर्षी जानेवारीमध्ये 694 रुपये होती, जी फेब्रुवारीमध्ये वाढवून 719 रुपये प्रति सिलेंडर करण्यात आली. 15 फेब्रुवारीला किंमत वाढवून 769 रुपये करण्यात आली. यानंतर, 25 फेब्रुवारी रोजी एलपीजी सिलेंडरची किंमत 794 रुपये करण्यात आली. मार्चमध्ये एलपीजी सिलिंडरची किंमत 819 रुपयांपर्यंत कमी करण्यात आली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

scroll to top
error: आपल्याला माहिती कॉपी करण्याची परवानगी नाही.