टोक्यो पॅरालिम्पिकमध्ये भारतीय नेमबाज अवनी लेखरा ने सुवर्णपदकाचा वेध घेतला. 10 मीटर एअर रायफलच्या क्सास एसएच १ मध्ये तिने हे पदक पटकावले आहे.
अवनीने चांगले प्रदर्शन करत फायनलमध्ये प्रवेश केला होता. क्वालिफिकेशन राऊंडमध्ये 21 नेमबाजांनी भाग घेतला होता. यामध्ये सातव्या स्थानावर असलेल्या अवनीने चांगले प्रदर्शन करत फायनलमध्ये प्रवेश केला. तिने 60 सीरीजच्या सहा शॉटमध्ये 621.7 स्कोअर बनविला. यामुळे तिला पहिल्या आठमध्ये जागा मिळाली. चीनची झांग कुइपिंग आणि यूक्रेनॉची इरियाना शेतनिक 626.0 स्कोअर केला होता.