राजकारणात वातावरण बदल होत आहे. काही विषाणुही परत येत आहेत, असा टोला लगावताच जे काही घडलं तो विषय आमच्यासाठी संपला आहे. आम्ही जनतेसाठी काम करत राहू, असं विधान पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी केलं आहे.
मुंबईच्या पहिल्या वातावरण कृती आराखड्याचा शुभारंभ राज्याचे पर्यावरण, पर्यटन आणि राजशिष्टाचार मंत्री आदित्य ठाकरे यांनी यांच्या हस्ते करण्यात आला. त्यावेळी आदित्य ठाकरे याांनी ही टीका केली. मुंबईत सातत्यानं वातावरण बदलाचे परिणाम बघायला मिळत आहेत. मुंबईतल्या वातावरण बदलाचा कृती आराखडा मुंबई महापालिकेकडून तयार केला जाणार आहे. या कृती आराखड्याबाबत नागरिकांच्या तसेच तज्ज्ञांच्या हरकती व सूचना मागवण्यात आल्या आहेत. या हरकती सूचना नोंदवण्यासाठी महापालिकेनं स्वतंत्र वेबसाईट तयार केली असून त्याचा शुभारंभ आज पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरेंच्या हस्ते करण्यात आला. हा कृती आराखडा डिसेंबरपर्यंत पूर्ण होणार आहे. तसेच, राज्य सरकारच्या नवीन ईलेक्ट्रिक व्हेईकल धोरणानुसार महापालिकेनं आता वापरासाठी नवी विद्युत वाहनं खरेदी केली आहेत.
वातावरण बदलतंय. गेल्या 10 वर्षात हा बदल होतोय. आपण अॅक्शन प्लान तयार करतोय. नोव्हेंबरपर्यंत सर्व जणांचे मतं आम्ही मागवत आहोत. हा प्लान फक्त मुंबईसाठी नाही तर राज्यासाठी असेल. वातावरण बदलतंय. विषाणू देखील बदलतात. जर कोरोना संख्या वाढली तर समस्या वाढेल. वातावरण जसं बदलत आहे तसं उत्तर देणं गरजेचं आहे. जनतेसाठी आता काम करत राहू, असं आदित्य म्हणाले.
माझी वसुंधरा अभियानाचा दुसरा भाग सुरु झालाय. एमएमआरडीए आणि बीएमसी मिळून हा कृती आराखडा तयार होतोय. बीएमसीनं आता इलेक्ट्रिक गाड्या घ्यायला सुरुवात केलीय, असं सांगतानाच राजकारणात वातावरण बदल होतोय आणि काही विषाणुही येतायेत. जे काही घडलं… आता आमच्यासाठी हा विषय संपला आहे, असं ते म्हणाले.