बिग बॉस मराठीच्या नव्या सिझनची सध्या सगळीकडे हवा आहे. नवा सिझन येणार अशी माहिती समोर आल्यापासूनच एक वेगळीच उत्सुकता प्रेक्षकांमध्ये दिसत आहे. मागच्या तीनही सिझनला मिळालेला प्रतिसाद बघता येणार नवा सिझन अजून भव्य असणार याची कल्पना येत आहेच पण नव्या सिझनच्या होस्टबद्दल बरीच वेगवेगळी माहिती समोर येत होती. आता मात्र कार्यक्रम बघायला उत्सुक असलेल्यांनी आनंद व्यक्त करायला हरकत नाही कारण या नव्या सीझनचे होस्ट सुद्धा महेश मांजरेकरच असणार अशी माहिती समोर आली आहे.
कलर्स मराठी आणि स्वतः महेश मांजरेकर यांनी या माहितीला पुष्टी दिली आहे. कलर्स वाहिनीच्या इन्स्टाग्राम पेजवरून एक प्रोमोसुद्धा शेअर करण्यात आला आहे.
इतके दिवस महेश या नव्या सिझनचं सूत्रसंचालन करणार नाहीत असं सांगण्यात येत होतं. त्यांच्याशिवाय या घराला मजा नाही असं चाहत्यांचं म्हणणं होतं. त्यांना परत आणा अशी मागणीसुद्धा केली जात होती. आता चाहत्यांच्या मागणीचा आदर ठेवत महेश नव्या सीझनच्या सूत्रसंचालनाची धुरा सांभाळताना दिसणार आहेत.