सध्या देशाच्या स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाच्या निमित्ताने ‘हर घर तिरंगा’ या उपक्रमाचे आव्हान पतंप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले आहे. त्यामुळे हर घर तिरंगा ही मोहीम प्रत्येक गावात, प्रत्येक ठिकाणी राबविली जात आहे. मात्र, या उपक्रमादरम्यान, एक दु:खद बातमी समोर आली आहे.
यंदा भारत स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करत आहे. या निमित्ताने ‘हर घर तिरंगा’ उपक्रमात सहभागी होत घरावर तिरंगा लावण्यासाठी चढलेल्या एका जेष्ठ नागरिकाचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. ही घटना जव्हार तालुक्यातील राजेवाडी येथे घडली. लक्ष्मणभाऊ शिंदे (65) हे घरावर तिरंगा लावायला चढले होते. मात्र, त्याचवेळी छपरावरील कवले फुटली आणि त्यामुळे ते खाली कोसळले. या दुर्घटनेत त्यांचा मृत्यू झाला.लक्ष्मणभाऊ शिंदे हे महानगर टेलिफोन निगम लिमिटेड या कार्यालयातून सेवानिवृत्त झाले होते. शनिवार सकाळी सकाळी आठ वाजताच्या सुमारास ही घटना घडली. त्यांना जव्हार येथील उपजिल्हा रुग्णालयात त्यांना दाखल करण्यात आले होते. मात्र, त्यांना गंभीर स्वरूपाची दुखापत झाली होती. यामुळे नंतर नाशिक येथील सत्र रुग्णालयात हलविण्यात आले. याठिकाणी त्यांचा मृत्यू झाला.