देशात सध्या कोरोनाचं संकट आहे. कोरोनाची दुसरी लाट अद्याप ओसरली नसल्याचा दावा अनेक तज्ज्ञ करत आहे. कोरोनाच्या या संकटाशी दोन हात करण्यासाठी सध्या लसीकरणाचे शस्त्र वापरले जात आहे.भारतात सध्या सहा लशींना आपत्कालीन वापरासाठी मंजूरी देण्यात आली आहे.
देशात आतापर्यंत सीरम इन्स्टिट्यूटची कोविशिल्ड, भारत बायोटेकची कोव्हॅक्सिन, रशियाची स्पुटनिक व्ही, अमेरिकेची मॉडर्ना आणि जॉन्सन जॉन्सनच्या सिंगल डोस असलेल्या लसीला परवानगी दिली आहे. भारताने आज लसीकरणासंदर्भात दोन विक्रम केले आहेत. याबाबतची माहिती केंद्रीय आरोग्यमंत्री मनसुख मांडविय यांनी दिली आहे.
गेल्या १६ जानेवारीपासून देशात लसीकरणाच्या मोहिमेचा प्रारंभ करण्यात आला होता. त्यानंतर गेल्या ८ महिन्यांमध्ये देशात आतापर्यंत 62 कोटी डोस देण्यात आले आहेत, अशी माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिली आहे. इतकंच नव्हे तर आज आणखी एक विक्रम नोंदवला गेला आहे. देशात आज एका दिवसांत तब्बल एक कोटी डोस नागरिकांना देण्यात आले आहेत. याबाबतची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिली आहे.