तालुका हा सह्याद्री पर्वताच्या घनंदाड मौल्यवान सागवानी वृक्षाच्या जंगल भागात आहे. या जंगल भागातील सागवान वृक्षाचे संगोपन व रक्षण करण्यासाठी सन १९६९ साली माहुर येथे वनपरीक्षेत्र कार्यालयाची स्थापना करुन ५ वनपरीमंडळ तर २१ ठिकाणी बिट ची स्थापना केली. मात्र वनपाल, वनरक्षक हे मुख्यालयी राहत नसल्याने मोठ्या प्रमाणात अवैध वृक्ष तोड होत असल्याने जंगल पार विरळ होत चालले असुन सह्याद्री पर्वताचे घनंदाट जगंल नष्ट होते कि काय ? असा प्रश्न उपस्थित होत आहे.
कार्यरत प्रभारी वनपरीक्षेत्र अधिकारी हे स्वतःच नांदेड वरून अपडाऊन करत कर्तव्याची औपचारिकता पार पाडत असल्याने कामचुकार व मुख्यालयी दांडी मारणाऱ्या वनपाल व वनरक्षक यांच्यावर कार्यवाही करतील काय ?
साडेतीन शक्ती पिठा पैकी एक शक्ती पिठ असलेल्या माहुरगडा वरील जंगलात अवघ्या काही वर्षा खाली अतिशय घनदाट जंगल असल्याने नक्षलवादी यांचे वासतव्य होते पण अधिकारी व कर्मचारी यांच्या” दिन जाव तनखा पाव” या उदाशिन धोरणामुळे हे सह्याद्री पर्वतावरील अवैध वृक्ष तोडी मुळे जंगल पार विरळ होत चालले असुन या जंगलाचे रक्षण करण्यासाठी शासनाने माहुर येथे वनपरीक्षेत्र कार्यालयाची स्थापना सन १९६९ साली केली आहे तर या वनपरीक्षेत्र कार्यालया अतंर्गत एकुण ५ मंडळ तर २१ बिट आहेत व एकुण वनक्षेत्र १३ हजार ६१७.९८१ हेक्टर असुन या मध्ये राखिव वनक्षेत्र ९ हजार ९८५.१३३ हे.एवढे आहे.
समुद्र सपाटी पासुन रामगड किल्याची उंची सुमारे २६०० फुट ( ५७०) मी.ऐवठी असुन २० हेक्टर मध्ये हा किला वसला आहे. जंगल भागाचे संरक्षण करण्यासाठी १ वनपरीक्षेत्र अधिकारी, २ रिक्त असल्याने ४ वनपाल , ४ रिक्त असल्याने १७ वनरक्षक नियुक्ती करण्यात आली असुन या पैकी अनेक वनपाल व वनरक्षक हे मुख्यालयास न राहता किनवट, विर्दभातील यवतमाळ जिल्हातील महागाव येथुन तर काही वाई बाजार व माहूर तालुक्याच्या शहरातून पंधरवाडी बीटला भेटी देऊन वनपरिमंडळ व बिटास खो देत मुख्यालयाला दांडी मारून अपडाऊन करत आहे.बिट व वन परीमंडळातील जंगलात दुर्मिळ वन औषधी उपयुक्त झाडे व सागवाण वृक्षाची अवैध कत्तल तसेच हरीण ससा रोही व अन्य वन्य प्राण्याच्या शिकारी मोठ्या प्रमाणात होत असुन जंगल व वण्य प्राणी नामशेष होण्याच्या मार्गवर आहे.
अशा कामचुकार मुख्यालयास न राहणाऱ्या वनपाल , वनरक्षक कर्मचारी यांच्यावर वरिष्ठांनी कार्यवाही करून व होणारी अवैध वृक्ष तोड थांबवुन पर्यावरण समतोल राखावा अशी मागणी पर्यावरण प्रेमी नागरीकातुन होत आहे.
– राजकिरण देशमुख, माहुर