बॉलिवूडचं संगीत हे फक्त भारतापर्यंत मर्यादित नाही. बॉलिवूडच्या गाण्यांचे परदेशातही दिवाने आहेत. अशात 90च्या दशकातील गाणी म्हणजे काही सांगायलाचं नको. आता कितीही हीट गाणी प्रदर्शित झाले तरी अभिनेत्री माधुरी दीक्षितच्या गाण्यांची मजा वेगळीचं आहे. सध्या सोशल मीडियाचा जमाना आहे. सोशल मीडियावर रोज अनेक व्हिडिओ व्हायरल होत असतात, आता देखील एका परदेशी काकांचा व्हिडिओ सोशल मीडियावर चर्चेत आहेत.
या परदेशी काकांचं नाव रिकी पॉन्ड असं आहे. ते आता माधुरी आणि अभिनेता आमिर खान स्टारर ‘दिल’ चित्रपटातील ‘दम दमा दम’ गाण्यावर डान्स करताना दिसत आहे. रिकी पॉन्ड कायम बॉलिवूडच्या गाण्यावर व्हिडिओ तयार करत असतात. ‘दम दमा दम’ गाण्यावरील डान्सला 10 हजारपेक्षा जास्त लोकांनी लाईक केलं आहे.
रिकी पॉन्ड यांनी त्यांच्या डान्सिंग स्टाईलने नेटिझन्सच्या मनात एक वेगळी जागा निर्माण केली आहे. अभिनेत्री प्रिती झिंटा सारख्या कलाकारांनी रिकी पॉन्ड यांच्या डान्सिंग स्टाईलचं कौतुक केलं आहे. त्यांच्या या डान्सनंतर लोक म्हणत आहेत, त्यांना बॉलिवूडमध्ये घ्याव.
(फोटो क्रेडिट गुगल)