कारमध्ये आता 6 एअरबॅग्ज असणार

आता कारचा प्रवास आणखी सुरक्षित होणार आहे. कारमध्ये 6 एअरबॅग्ज असणार आहेत, असे संकेत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी दिले आहेत. केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्गमंत्री नितीन गडकरी यांनी भारतीय वाहन उत्पादक सोसायटीच्या कार्यकारी प्रमुखांच्या प्रतिनिधी मंडळाची भेट घेतली. त्यावेळी ही माहिती दिली.

नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी चारचाकी वाहनांच्या सर्व श्रेणींमध्ये किमान सहा एअरबॅग्ज असणे, अत्यंत गरजेचे आहे. वाहन उत्पादकांनी त्याकडे लक्ष द्यावे, असे निर्देश केंद्रीयमंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांनी वाहन उत्पादकांना दिले आहेत.

गडकरी यांनी सर्व वाहन उत्पादकांना ‘फ्लेक्स्- फ्यूएल’ flex-fuel म्हणजेच, इंधनाच्या दृष्टीने लवचिक म्हणजेच 100 टक्के इथेनॉल आणि गॅसोलिनवर चालणार्‍या गाड्या लवकरात लवकर म्हणजेच, एका वर्षात भारतीय बाजारात आणाव्यात, अशी आग्रही सूचना केली. ब्राझील Brazil आणि अमेरिकेत USA हे तंत्रज्ञान यशस्वी झाले असून तिथल्या तयार तंत्रज्ञानाच्या मदतीने गाड्यांचे उत्पादन करावे, अशी सूचना त्यांनी केल्या आहेत.
तसेच, बीएस-6 आणि सीएफएन टप्पा दुसरा अशा उत्सर्जन आधारित नियमनांची अंमलबजावणी पुढे ढकलावी, अशी विनंती करताना दुचाकी वाहनांसाठीचे ओबीडी (OBD) नियमनदेखील पुढे ढकलावे, असे गडकरी यांनी सांगितले.
(फोटो क्रेडिट गुगल)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

scroll to top
error: आपल्याला माहिती कॉपी करण्याची परवानगी नाही.