पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतींबाबत केंद्रीय पेट्रोलियम मंत्री हरदीप सिंह पुरी यांनी म्हटले आहे की, सरकार याबाबत गंभीर आणि संवेदनशील देखील आहेत. पेट्रोलच्या किंमतींमध्ये दिलासा देण्याबाबत सरकार शक्य ते सर्व प्रयत्न करीत आहेत. तसेच त्यांनी म्हटले की राज्य सरकारांची इच्छाशक्ती असेल तर ते पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती कमी करू शकतात.
पेट्रोलियम उत्पादनांबाबत वाढत्या किंमतींबाबत पत्रकारांच्या प्रश्नाला उत्तर देताना, पुरी यांनी म्हटले की, याप्रती संवेदनशील आहेत आणि 10 टक्के मिश्रणसारखे प्रयोग करून इंधनाच्या किंमती कमी करण्याबाबत प्रयत्नशील आहोत. केंद्र सरकार इंधनावर एक्साइज ड्युटी लावत असते. तर राज्य त्यावर वॅट लावते.
ऑईल मार्केटिंग कंपन्यांनी 32 दिवसांनी बुधवारी दिल्लीतील डिझेलच्या होलसेल भावात 20 पैसे प्रतिलीटरने कपात केली होती. पेट्राल ग्राहकांसाठी सध्या कोणताही दिलासा नाही, तेल कंपन्यांनी सलग 32 व्या दिवशी पेट्रोलच्या किंमतींमध्ये बदल केलेला नाही.
(फोटो क्रेडिट गुगल)