येथील रोटरी क्लब आॕफ जळगाव सेंट्रलतर्फे जळकातांडा येथील जि.प.प्राथमिक शाळेत १०० विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वितरण करण्यात आले.
रोटरी क्लबतर्फे राबविण्यात आलेल्या उपक्रमास डाॕ.राहुल मयुर, डाॕ. भुवनेश्वर सिंग, कल्पेश दोशी, संदीप मुथा, दिलीप लुणीया , डाॕ.अनंत पाटील यांचे सहकार्य लाभले.
यावेळी अध्यक्ष विपुल पारेख , सेक्रेटरी रविंद्र वाणी , विष्णू भंगाळे ,संतोष अग्रवाल,कल्पेश दोशी, मिलन मेहता, राजेंद्र पिंपरकर , ललित मलारा आणि दिनेश थोरात उपस्थित होते.तसेच यावेळी केंद्रप्रमुख कैलास सुपडू पवार,शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष भंगू भारमल चव्हाण, शाळेचे मुख्याध्यापक सोमनाथ ब्रिजलाल पाटील, तंटामुक्तीचे अध्यक्ष ज्ञानेश्वर भागचंद चव्हाण, दापोरा येथील उपशिक्षक गोपीचंद भालेराव, सावखेडा येथील उपशिक्षक ठोसरे उपस्थित राहून उपक्रमाचे कौतुक केले.