देशात कोरोनाग्रस्तांच्या रुग्णसंख्येत चढउतार पाहायला मिळत आहेत. गेल्या 24 तासात आदल्या दिवसाच्या तुलनेत कोरोना बाधितांच्या संख्येत जवळपास 10 हजारांनी वाढ झाली. कालच्या दिवसात 35 हजार 178 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली. कालच्या दिवसात 440 कोरोनाग्रस्तांना प्राण गमवावे लागले. सक्रिय रुग्णसंख्या सध्या चार लाखांच्या खालीच आहे. कोरोनातून बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या वाढत असल्याने दिलासा मानला जात आहे.
गेल्या 24 तासात भारतात 35 हजार 178 नव्या कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर 440 रुग्णांना प्राण गमवावे लागले. कालच्या दिवसात देशात 37 हजार 169 जण कोरोनामुक्त होऊन घरी परतले.
भारतातील एकूण कोरोनाग्रस्तांचा आकडा आता 3 कोटी 22 लाख 85 हजार 857 वर गेला आहे. देशात आतापर्यंत 3 कोटी 14 लाख 85 हजार 923 रुग्ण बरे झाले आहेत. तर 4 लाख 32 हजार 519 रुग्णांनी आतापर्यंत कोरोनामुळे प्राण गमावले आहेत. 3 लाख 67 हजार 415 इतके सध्याच्या घडीला सक्रिय रुग्ण आहेत.
आतापर्यंत कोरोना लसीकरण झालेल्या देशातील नागरिकांची संख्या 56 कोटी 6 लाख 52 हजार 30 इतकी असल्याची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिली आहे.